नव्या चित्रपटांअभावी चित्रपटगृहे अजूनही बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:15 AM2021-02-05T07:15:28+5:302021-02-05T07:15:28+5:30

इंदुमती गणेश : लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्य शासनाने चित्रपटगृहे सुरू करण्यास परवानगी देऊन तीन महिने झाले तरीही ...

Cinemas are still closed due to lack of new films | नव्या चित्रपटांअभावी चित्रपटगृहे अजूनही बंदच

नव्या चित्रपटांअभावी चित्रपटगृहे अजूनही बंदच

Next

इंदुमती गणेश :

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : राज्य शासनाने चित्रपटगृहे सुरू करण्यास परवानगी देऊन तीन महिने झाले तरीही नव्या चित्रपटांअभावी एक पडदा चित्रपटगृहे बंदच आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सर्वच उद्योग व्यवसाय नव्या जोमाने सुरू झाले असले तरी चित्रपटगृहे त्याला अपवाद ठरली आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मची चलती असताना प्रेक्षकांना चित्रपटगृहांपर्यंत यायला भाग पाडणाऱ्या नव्या चित्रपटांची व्यावसायिकांना प्रतीक्षा आहे.

कोरोनामुळे सुरू असलेले लॉकडाऊनचे नियम नोव्हेंबरमध्ये शिथिल करण्यात आले. त्याचवेळी चित्रपटगृहांमध्ये ५० टक्के आसनक्षमतेने हा व्यवसाय सुुरू करण्यास परवानगी दिली गेली. त्यातही प्रत्येकवेळी सॅनिटायझेशन, खाद्यपदार्थांवर बंदी अशी नियमावलीच इतकी त्रासदायक होती की सिंगल स्क्रीन चित्रपटगृह मालकांनी ते बंदच ठेवणे पसंत केले. जी काही मोजकी चित्रपटगृहे सुरू झाली त्यांना पूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचाच आधार घ्यावा लागला. पण वारंवार टीव्ही स्क्रीनवर लागून गेेलेले चित्रपट पाहण्यासाठी कोणी येईना म्हणून पुन्हा चित्रपटगृह बंद ठेवावे लागले. सध्या कोल्हापूर शहरात तीन मल्टिप्लेक्स आणि १२ सिंगल स्क्रीन चित्रपटगृहे आहेत. त्यापैकी चार चित्रपटगृहे गेली कित्येक वर्षे बंदच आहे. उरलेली चित्रपटगृहे नवे चित्रपट आलेले नसल्याने बंद आहेत.

---

वितरणाचे करार नाही

मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक चित्रपट कोरोना काळात ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले. या काळात चित्रपटगृहात येणाऱ्या प्रेक्षकांना मोबाईलवर चित्रपट पाहण्याची सवय लागली. अजूनही कोरोनाचा प्रभाव संपलेला नसल्याने निर्माते-दिग्दर्शक चित्रपट तयार असूनही वितरण करायला तयार नाहीत. नवे चित्रपटच प्रदर्शित झालेले नाहीत, अजूनही त्यांच्या वितरणाबाबतची कोणतीही चर्चा किंवा करार झालेले नाहीत.

----

राज्य शासनाची परवानगी हवी

केंद्र शासनाने नुकतीच चित्रपटगृहे शंभर टक्के प्रेक्षक क्षमतेने सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, राज्य शासनाकडून अजून त्यावर शिक्कामोर्तब झालेला नाही. तसा अध्यादेश येईपर्यंत चित्रपटगृह बंदच राहतील.

---

या अडचणीच्या काळात चित्रपट व्यवसायालाही बूस्टर डोस हवा आहे. नवीन चित्रपट नसल्याने व्यवसाय बंद आहे. मल्टीप्लेक्स, शॉपींग मॉलच्या ठिकाणी असलेली चित्रपटगृहे सुरू आहेत, पण सिंगल स्क्रीन व्यावसायिकांचा कठीण काळ संपण्यासाठी चित्रपटांचे प्रदर्शन सुरू व्हायला हवे.

सूर्यकांत-पाटील-बुद्धीहाळकर

अध्यक्ष कोल्हापूर सिनेएक्झिब्युटर्स असोसिएशन

----

फोटो नं ०३०२२०२१-कोल-चित्रपटगृह०१,०२

ओळ : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरही नवीन चित्रपट प्रदर्शित झालेली नसल्याने कोल्हापुरातील चित्रपटगृह बुधवारी बंद होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)

--

Web Title: Cinemas are still closed due to lack of new films

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.