दिवाळी कॅश करण्यासाठी चित्रपटगृहे सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 11:36 AM2020-11-05T11:36:51+5:302020-11-05T11:39:32+5:30
diwali, cinema, kolhapurnews दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहे सुरू करण्यास राज्य शासनाने व्यावसायिकांना परवानगी दिल्याने व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. ही दिवाळी कॅश करण्यासाठी चित्रपटगृह व्यवस्थापनाकडून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन कसे करायचे यापासून ते अर्थकारणापर्यंतचे नियोजन सुरू आहे.
कोल्हापूर : दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहे सुरू करण्यास राज्य शासनाने व्यावसायिकांना परवानगी दिल्याने व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. ही दिवाळी कॅश करण्यासाठी चित्रपटगृह व्यवस्थापनाकडून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन कसे करायचे यापासून ते अर्थकारणापर्यंतचे नियोजन सुरू आहे.
कोल्हापूर शहरात सात सिंगल स्क्रीन आणि तीन मल्टिप्लेक्स अशी दहा चित्रपटगृहे आहेत तर जिल्ह्यात ३५ चित्रपटगृहे आहेत. कोरोना सुरू झाल्यापासून गेली सात महिने ही चित्रपटगृहे बंद आहेत.
आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ५० टक्के प्रेक्षक क्षमतेने आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून चित्रपटगृहे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. पण पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याशिवाय आर्थिक घडी बसणार नाही, असे सिंगल स्क्रीन असलेल्या व्यावसायिकांची मानसिकता आहे. त्यामुळे सुरुवातीला कदाचित मल्टिप्लेक्स सुरू होतील, अशी शक्यता आहे.