दक्षता घेत चित्रपटगृहे झाली सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:22 AM2021-03-20T04:22:40+5:302021-03-20T04:22:40+5:30
कोल्हापूर : एक वर्षाच्या ब्रेकनंतर शुक्रवारी कोल्हापुरातील चित्रपटगृह पुन्हा एकदा नवा चित्रपट आणि प्रेक्षकांनी फुलले. मुंबई सागा हा हिंदी ...
कोल्हापूर : एक वर्षाच्या ब्रेकनंतर शुक्रवारी कोल्हापुरातील चित्रपटगृह पुन्हा एकदा नवा चित्रपट आणि प्रेक्षकांनी फुलले. मुंबई सागा हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला असून यामुळे शहरातील पद्मा, शाहू, उर्मिला यासह अन्य काही चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची वर्दळ पाहायला मिळाली.
कोरोना, लॉकडाऊन, कडक नियमावली, नव्या चित्रपटांचा अभाव या अडचणींच्या जंत्रीनंतर अखेर शुक्रवारी चित्रपटगृहांनी पुन्हा एक व्यवसायाचा श्रीगणेशा केला. कोरोनामुळे सध्या ५० टक्के प्रेक्षक क्षमतेचा नियम असून यासह सॅनिटायझर, मास्क सामाजिक अंतर या मार्गदर्शन सूचनांचे पालन करुन प्रेक्षकांना प्रवेश देण्यात आला. सर्व चित्रपटगृहांमध्ये चार खेळ सुरु झाले असले तरी पहिला दिवस असल्याने तुलनेने प्रेक्षक संख्या कमी होती. बिग बजेट आणि प्रसिद्ध कलाकार असलेले चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या व्यवसायाला खऱ्या अर्थाने उभारी येईल.
---
फोटो नं १९०३२०२१-कोल-थिएटर
ओळ : कोरोनामुळे एक वर्षाच्या ब्रेकनंतर शुक्रवारी कोल्हापुरातील चित्रपटगृहांचा पडदा उघडला. यामुळे आवारात तिकीट खरेदीसाठी प्रेक्षकांच्या रांगा लागल्या होत्या. (छाया : आदित्य वेल्हाळ)
--