मंडलिकांच्या गुगलीने कागलमध्ये खळबळ

By admin | Published: October 31, 2016 12:14 AM2016-10-31T00:14:57+5:302016-10-31T00:14:57+5:30

दबावाचे राजकारण : ‘हमीदवाडा’ निवडणुकीची किनार; विधानसभेसाठी वेगळीच समीकरणे दिसणार...

Circling googly with excitement in Kagal | मंडलिकांच्या गुगलीने कागलमध्ये खळबळ

मंडलिकांच्या गुगलीने कागलमध्ये खळबळ

Next

कोल्हापूर : कागल व मुरगूड नगरपालिका निवडणुकांच्या राजकारणाने चांगलीच उसळी खाल्ली असून, प्रा. संजय मंडलिक यांच्या गुगलीने कागल तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मंडलिक यांच्या भूमिकेमागे दबावाचे राजकारण असले तरी हमीदवाडा साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीची किनारही त्यात पाहावयास मिळत आहे.
जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीपासून कागलमधील राजकारण बदलत गेले. आमदार हसन मुश्रीफ यांनी संजय मंडलिक यांच्याशी जुळवून घेत दोन्ही गटांतील संघर्षाची धार कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोन्ही गटांतील संवाद वाढत गेला आणि भावनिकतेचे वातावरण तयार झाले. दोन्ही गट एकत्र येणे ही दोघांचीही राजकीय अपरिहार्यता आहे. समरजितसिंह घाटगे यांनी भाजपशी घरोबा केल्याने विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मुश्रीफ यांच्या अडचणी वाढणार आहेत. त्यामुळे मंडलिक गटाशी जुळवून घेणेच त्यांच्या दृष्टीने फायद्याचे होते.
गत लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक यांना कागलमधूनच मुश्रीफ यांनी टोकाचा विरोध केल्याने त्याचा फटका बसला. मुश्रीफ गटाशी असलेली संघर्षाची धार कमी करून त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीत करून घेण्याचा मंडलिक यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे वर्षभरातील हालचाली पाहता आगामी काळात दोन्ही
गट एकत्र येणार अशी चर्चा होती. त्याची सुरुवात नगरपालिका निवडणुकीपासून झाली. मुश्रीफ व प्रा. मंडलिक यांच्यात चर्चा झाली. प्रा. मंडलिक यांनी दोन्ही गटांशी चर्चा करीत राजकीय मुत्सद्देगिरी दाखवत गुगली टाकल्याने कागल तालुक्यात खळबळ उडाली आहे. मंडलिक यांच्या या भूमिकेने कागलच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार, हे मात्र निश्चित आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत वेगळी समीकरणे उदयास आली तर आश्चर्य नको, अशीच चर्चा सुरू आहे.
दोन कारणे : दबाव आणि कारखान्याची निवडणूक कळीचा मुद्दा...
४शिवसेना-भाजप युतीवर शिक्कामोर्तब होऊनही मंडलिक यांनी बाबगोंडा पाटील व चंद्रकांत गवळी यांच्या माध्यमातून मुश्रीफ गटाशी चर्चा सुरू ठेवली.
४यामागे दोन कारणे असू शकतात. त्यातील पहिले म्हणजे मुश्रीफ यांच्याशी चर्चा सुरू ठेवून भाजपचे समरजितसिंह घाटगे यांच्यावर दबाव टाकायचा.
४तसेच आपल्या पदरामध्ये जास्त जागा पाडून घ्यायच्या.
४दुसरे, हमीदवाडा कारखान्याची निवडणूक तोंडावर आली आहे. तिथे मुश्रीफ गट विरोधात आहे, नगरपालिकेच्या माध्यमातून आघाडी करून ‘हमीदवाडा’ बिनविरोध करण्याची व्यूहरचनाही
प्रा. मंडलिक यांची असू शकते.

Web Title: Circling googly with excitement in Kagal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.