सर्किट बेंचसाठी कोल्हापूरात वकिलांचा असहकार कायम, न्यायालयाबाहेर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 05:43 PM2019-03-25T17:43:37+5:302019-03-25T17:46:16+5:30
सर्किट बेंचसाठी वकीलांनी पुन्हा आंदोलनाचे रणशिंग फुकले. सोमवारपासून १ एप्रिल पर्यंत न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने घेतला. त्यानुसार वकीलांनी न्यायालयाच्या बाहेर ठिय्या मांडला. त्यांच्या आंदोलनास दिवसभरात पक्ष, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन आपला पाठींबा दिला.
कोल्हापूर : सर्किट बेंचसाठी वकीलांनी पुन्हा आंदोलनाचे रणशिंग फुकले. सोमवारपासून १ एप्रिल पर्यंत न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने घेतला. त्यानुसार वकीलांनी न्यायालयाच्या बाहेर ठिय्या मांडला. त्यांच्या आंदोलनास दिवसभरात पक्ष, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन आपला पाठींबा दिला. वकीलांच्या असहारामुळे न्यायालयात शुकशुकाट होता. पक्षकाराची मात्र गैरसोय झाली.
कोल्हापूर सर्किट बेंचला अंतिमत: मंजुरी मिळत नाही, तोपर्यंत विविध मार्गांचा अवलंब करण्याचा निर्णय बार असोसिएशनने घेतला आहे. सर्किट बेंचबाबत सहा जिल्'ांतील वकिलांच्या भावना तीव्र आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नरेश पाटील यांनी या प्रश्नी सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही.
कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिधुदूर्ग या सहा जिल्हयांसाठी कोल्हापूरात मध्यवर्ती ठिकाणी उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, या मागणीसाठी गेल्या ३४ वषार्पासून वकील संघटना आंदोलन करीत आहेत. वकीलांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. २५ मार्च ते १ एप्रिल असे आठ दिवस कामबंद आंदोलन पुकारले आहे. सोमवारी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सर्व वकील जिल्हा न्यायालयाच्या कमानीच्या बाहेर उभारलेल्या मंडपात बसून होते.
न्यायालयीन कामकाजासाठी येणाऱ्या पक्षकारांना वकीलांचे आंदोलन सुरू आहे, असे समजल्यावर त्यांचे काम झाले नाही, पुढील तारीख घेऊन परतावे लागले. त्यातून पक्षकारांना गैरसोय झाली. खटल्यांचे कामकाज सुरू करण्यासाठी वकीलच उपलब्ध नसल्याने न्यायालयात दिवसभर शुकशुकाट दिसत होता.
यावेळी माजी अध्यक्ष शिवाजीराव राणे, अॅड. अजित मोहिते, प्रशांत मोरे, विवेक घाटगे, महादेवराव आडगुळे, सतिश खोतलांडे, राजेंद्र मंडलिक, बाळासाहेब पाटील, विजय महाजन, चारुलता चव्हाण, स्वाती तानवडे, दीपाली पवार, धैर्यशील पवार, ओंकार देशपांडे, अभिषेक देवरे, अभिजित कापसे, रणजित गावडे, सचिन पाटील, प्रशांत पाटील, मनोज पाटील, हेमंत रणदिवे, अशोक पाटील, तेहजीब नदाफ, अरविंद मेहता, गुरुप्रसाद माळकर, राजवर्धन पाटील, राजेंद्र मंडलिक, कुलदीप मंडलिक, सचिन आवळे, अतुल जाधव, निशांत वणकुंद्रे, दीपक पाटील, व्ही. आर. पाटील, असुमन कोरे, लालासो पाटील, एस.बी. पाटील, संतोष पाटील आदी वकील ठिय्यामध्ये सहभागी झाले होते.