सर्किट बेंचसाठी शर्थीचे प्रयत्न
By admin | Published: June 10, 2015 12:08 AM2015-06-10T00:08:29+5:302015-06-10T00:26:34+5:30
राजेंद्र चव्हाण : जिल्हा बार असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार
कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे ‘सर्किट बेंच’ कोल्हापुरात स्थापन व्हावे, या मागणीसाठी गेल्या २७ वर्षांपासून सहा जिल्ह्यांतील वकिलांचा लढा सुरू आहे. या लढ्यास अंतिम स्वरूप देऊन सर्किट बेंच लवकरात लवकर स्थापन करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचे खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक अॅड. राजेंद्र चव्हाण यांनी सांगितले.
जिल्हा बार असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणीचे स्वागत व सत्कार समारंभ कार्यक्रम बार असोसिएशनच्या हॉलमध्ये मंगळवारी आयोजित केला होता. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, उपाध्यक्ष प्रशांत चिटणीस, सचिव रवींद्र जानकर, विठोबा जाधव, महिला प्रतिनिधी धनश्री चव्हाण, सदस्य- विजय ताटे-देशमुख, माणिक शिंदे, सचिन मेंडके, सुस्मित कामत, मिलिंद जोशी, सुशीला कदम, आदींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी अॅड. चव्हाण यांनी सर्किट बेंचबाबत सुरू असलेल्या लढ्यास अंतिम स्वरूप देऊन ते लवकरात लवकर स्थापन व्हावे, यासाठी जरूर ते प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.
याप्रसंगी मावळते अध्यक्ष विवेक घाटगे, अॅड. आर. बी. मंडलिक, एस. आर. पिसाळ, पूजा कटके, के. ए. कापसे, के. व्ही. पाटील, एम. डी. आडगुळे, एस. बी. पाटील, शिवराम जोशी, डी. बी. भोसले, एस. आर. पिसाळ, शिवाजीराव चव्हाण, आदी पदाधिकाऱ्यांसह वकील उपस्थित होते. (प्रतिनिधी)