CoronaVirus In Kolhapur : प्रशासनासह नागरिकही गोंधळात; बाजारपेठीतील गर्दी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 06:28 PM2021-05-05T18:28:40+5:302021-05-05T18:43:43+5:30

CoronaVirus Kolhapur : सचारबंदी, लॉकडाऊन की जनता कर्फ्यू अशा मानसिक गोंधळात जिल्हा प्रशासन अडकले असताना शहरातील नागरीक मात्र रस्त्यावर येऊन गर्दी करत आहेत. बुधवारी दुकानांतील व्यवहार सुरु, बाजारपेठेत गर्दी, रस्त्यावर वाहनांची गर्दी, भाजी मंडईत महिलांची गर्दी होत असताना महापालिका, पोलिसांनी त्यांना अटकाव केला नाही.

Citizens also confused with the administration; The market crowd continues | CoronaVirus In Kolhapur : प्रशासनासह नागरिकही गोंधळात; बाजारपेठीतील गर्दी कायम

CoronaVirus In Kolhapur : प्रशासनासह नागरिकही गोंधळात; बाजारपेठीतील गर्दी कायम

googlenewsNext
ठळक मुद्देप्रशासनासह नागरिकही गोंधळात बाजारपेठीतील गर्दी कायम

कोल्हापूर : सचारबंदी, लॉकडाऊन की जनता कर्फ्यू अशा मानसिक गोंधळात जिल्हा प्रशासन अडकले असताना शहरातील नागरीक मात्र रस्त्यावर येऊन गर्दी करत आहेत. बुधवारी दुकानांतील व्यवहार सुरु, बाजारपेठेत गर्दी, रस्त्यावर वाहनांची गर्दी, भाजी मंडईत महिलांची गर्दी होत असताना महापालिका, पोलिसांनी त्यांना अटकाव केला नाही.

कोल्हापूर जिल्हयात संचारबंदी लागू करण्यात आली आहे, ती शनिवारपासून कडक करण्यात आली आहे. परंतु तरीही नागरीकांच्या झुंडीच्या झुंडी सकाळच्या सत्रात रस्त्यावर संचार करताना पहायला मिळत आहेत. भाजी मंडईत नागरीकांची गर्दी होत आहे. त्यामुळे गर्दी न करण्याच्या प्रशासनाच्या आवाहनास नागरीकांनी केराची टोपली दाखविली आहे.

राज्य सरकारने संचारबंदी लागू केली. जिल्हा प्रशासनाने मंगळवारी लॉकडाऊन जाहीर केला. लागलीच या लॉकडाऊनवर समाज माध्यमातून प्रचंड टीका होताच सायंकाळी लॉकडाऊन ऐवजी जनतेची कर्फ्यू जाहीर करण्यात आली. जिल्हा प्रशासन जसे गोंधळले आहे, तसेच शहरवासिय सु्ध्दा गोंधळून गेले आहेत. मंगळवारी आठ दिवस लॉकडाऊनचा निर्णय समाज माध्यमावर फिरताच नागरीकांनी बुधवार उजाडताच बाजारपेठेत गर्दी केली. आठवडाभर लागणाऱ्या भाज्या, जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यास गर्दी केली. गेल्या पंधरा दिवसातील ही सर्वाधिक गर्दी होती.

शहराच्या सर्वच रस्त्यावर नागरीकांचा संचार होता. वाहनांची काही ठिकाणी कोंडी झाल्याचे चित्रही पहायला मिळाले. सकाळी अकरा वाजता व्यवहार बंद ठेवायचे असताना अनेक ठिकाणी दुपारी एक पर्यंत सुरुच होती. दुपारपर्यंत शहरात असेच वातावरण होते. दुपारनंतर वळवाचा पाऊस दाटून आल्यानंतर मात्र रस्त्यावरील गर्दी ओसरली. शुकशुकाट पसरला.

Web Title: Citizens also confused with the administration; The market crowd continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.