वडगावातील महालक्ष्मी तलावांची नागरिकांकडून स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:17 AM2021-07-02T04:17:53+5:302021-07-02T04:17:53+5:30
परिसरातील अनेक नागरिक महालक्ष्मी तलावाच्या ट्रॅकवर व व्यायाम साहित्याचा वापर करण्यासाठी येतात. मात्र, या ट्रॅककडे पालिकेचे काहीसे दुर्लक्ष होत ...
परिसरातील अनेक नागरिक महालक्ष्मी तलावाच्या ट्रॅकवर व व्यायाम साहित्याचा वापर करण्यासाठी येतात. मात्र, या ट्रॅककडे पालिकेचे काहीसे दुर्लक्ष होत आहे.
या पार्श्वभूमीवर बंटी क्रिकेट क्लबने गावचे वैभव जपू या, दोन तास देऊ या, असे आवाहन सोशल मीडियावरून केले होते. याला शहरातील ४० हून अधिक जणांनी पहिल्या दिवशी प्रतिसाद दिला. घरातून येताना खुरपे, खोरे, कुऱ्हाड, विळा, पाटी, झाडू असे साहित्य आणून स्वच्छता केली. पाच ते सात दिवस स्वच्छता करण्यात येणार आहे. ‘माझे गाव, माझा स्वच्छ तलाव’ अशी संकल्पना घेऊन दररोज सकाळी दोन तास श्रमदान करण्यात येणार आहे. या मोहिमेस साथ द्यावी, असे आवाहन प्रथमेश महाजन यांनी केले. तर अल्पोपाहार माजी नगराध्यक्षा विद्या पोळ यांच्या वतीने देण्यात आला.
यावेळी सागर सणगर, सुधाकर पिसे, राजेंद्र जाधव, योगेश कुंभार , नितीन कुचेकर, अमोल चरणकर, नितीन सणगर, महेश्वर पाटील, स्वप्नील सणगर, प्रतीक सणगर, प्रमोद पाटील, शारदा जाधव, दीपाली पाटील, प्रतिभा पाटील आदी उपस्थित होते.
00000 चौकट:
वैभव जपा वडगाव शहरातील शाहू कालीन ठेवा असलेल्या महालक्ष्मी तलाव परिसरातील पाणलोट क्षेत्रात व्यावसायिक अतिक्रमणे व औद्योगिकीकरण सुरू आहे. त्यामुळे तलावाचे अस्तित्व पालिकेच्या उदासीन भूमिकेमुळे धोक्यात येणार आल्याची चिंता नागरिकांतून व्यक्त होत आहे. या प्रश्नी पालिकेने गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
●फोटो कॅप्शन : पेठवडगाव येथील महालक्ष्मी तलाव परिसरातील ट्रॅकवर स्वच्छता झाल्यानंतर असे दिसत आहे.
●फोटो कॅप्शन: पेठवडगाव येथील महालक्ष्मी तलाव परिसरात बंटी क्रिकेट व योग सेवा फाउंडेशनच्या वतीने सहभागी स्वयंसेवक.
०१ वडगाव महालक्ष्मी तलाव.