फुलेवाडी रिंगरोडवर पाण्यासाठी नागरिकांचे आयुक्तांंना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 12:51 PM2020-02-06T12:51:23+5:302020-02-06T12:52:43+5:30
फुलेवाडी रिंगरोडवरील जोंधळे कॉलनी, धनगर वसाहत परिसरात अमृत योजनेतून तीन महिने पाईपलाईनचे काम सुरू असल्याने पाणीपुरवठ्यापासून सुमारे तीनशे कुटुंब वंचित राहिली आहेत. त्यांना तातडीने पाणीपुरवठ्याची सोय करावी अन्यथा उद्या, शुक्रवारपासून आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, अशा इशाऱ्याचे निवेदन नागरिकांच्या शिष्टमंडळाने आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांना भेटून दिले.
कोल्हापूर : फुलेवाडी रिंगरोडवरील जोंधळे कॉलनी, धनगर वसाहत परिसरात अमृत योजनेतून तीन महिने पाईपलाईनचे काम सुरू असल्याने पाणीपुरवठ्यापासून सुमारे तीनशे कुटुंब वंचित राहिली आहेत. त्यांना तातडीने पाणीपुरवठ्याची सोय करावी अन्यथा उद्या, शुक्रवारपासून आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, अशा इशाऱ्याचे निवेदन नागरिकांच्या शिष्टमंडळाने आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांना भेटून दिले.
फुलेवाडी रिंगरोडवरील अमृत योजनेतून पाईपलाईनची गेली तीन महिने कामे सुरू आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी खुदाई केली आहे. जुनी पाईपलाईन तुटलेली आहे. नवीन पाईपलाईनचे काम पूर्ण होऊनही पाणीपुरवठा सुरू नाही. यामुळे या परिसरातील सुमारे ३०० मोलमजुरी करणाºया कुटुंबांना पाणीपुरवठ्यापासून वंचित रहावे लागत आहे.
अनेकवेळा अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही त्यांनी दखल न घेतल्याने नाईलाजास्तव आयुक्त यांच्याकडे दाद मागावी लागत आहे. महापालिकेचे अधिकारी परिसरातील काही पदाधिकाºयांच्या सांगण्यावरून मुख्य पाईपलाईनला कनेक्शन देत असल्याचाही आरोप यावेळी शिष्टमंडळाने केला.
चर्चेमध्ये काम पूर्ण होईपर्यंत या सर्व कुटुंबांना टँकरने पाणीपुरवठा केला तरी चालेल, अशीही भूमिका शिष्टमंडळाने आयुक्त डॉ. कलश्ोट्टी यांच्यासमोर मांडली. शिष्टमंडळात विजयसिंह देसाई, सर्जेराव कोदवडे, दीपक बोडके, तानाजी झोरो, बबन बोडके, बाबूराव आडुळकर, बंका बोडके, वैशाली गावडे, बयाजी शेळके, बयाबाई बोडके, बाबू येडगे, अक्षय राणे, हिरोजी लांबेरे, विनायक गडकरी, आदींचा समावेश होता.