पूर क्षेत्रातील नागरिकांनी पूर्वतयारी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:18 AM2021-06-05T04:18:47+5:302021-06-05T04:18:47+5:30

कोल्हापूर : यंदा कोरोना संसर्ग आणि जोरदार पावसाची शक्यता गृहित धरून पूर क्षेत्रातील नागरिकांनी पूर्वतयारी करावी, असे आवाहन पोलीस ...

Citizens in flood prone areas should be prepared | पूर क्षेत्रातील नागरिकांनी पूर्वतयारी करावी

पूर क्षेत्रातील नागरिकांनी पूर्वतयारी करावी

Next

कोल्हापूर : यंदा कोरोना संसर्ग आणि जोरदार पावसाची शक्यता गृहित धरून पूर क्षेत्रातील नागरिकांनी पूर्वतयारी करावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांनी शुक्रवारी केले. शाहूपुरी पोलीस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या दक्षता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

पोलीस निरीक्षक कटकधोंड म्हणाले, यंदा शंभर टक्के पाऊस हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पूरपरिस्थितीत तत्काळ मदतीसाठी मित्रमंडळी अथवा नातेवाईक येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे पूर क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांनी स्वत:हून पूर्वतयारी करावी. जेणेकरून कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवू नये. यासोबतच यंदाचा गणेशोत्सवही साधेपणाने साजरा करावा. जेणेकरून संसर्गाचा धोका उद्भवू नये. याबाबतची जनजागृती आतापासूनच करावी.

यावेळी पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड, सागर घोरपडे, शशिकांत बीडकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या माजी सदस्या संगीता खाडे, अकबर मोमीन आदी उपस्थित होते.

Web Title: Citizens in flood prone areas should be prepared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.