पूरक्षेत्रातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:17 AM2021-07-24T04:17:04+5:302021-07-24T04:17:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : धरण पाणलोट क्षेत्रासह कोकण आणि शहर परिसरात आठवडाभरापासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. विविध ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : धरण पाणलोट क्षेत्रासह कोकण आणि शहर परिसरात आठवडाभरापासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. विविध धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने येथे पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. संभाव्य महापुराची परिस्थितीची आमदार प्रकाश आवाडे यांनी प्रत्यक्ष नदीतीरी आणि शेळके मळा परिसरास भेट देऊन माहिती जाणून घेतली.
मागील महापुराचा अनुभव पाहता यंदा तशी परिस्थिती उद्भवू नये, याची काळजी घेतली जात आहे. पूरक्षेत्रातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन आमदार आवाडे यांनी केले. त्यांनी पंचगंगा नदीवरील पुलावरून पाहणी करत पालिकेच्या आपत्कालीन विभागप्रमुख संजय कांबळे यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, अहमद मुजावर, संजय आरेकर, तानाजी कोकीतकर आदी उपस्थित होते.
फोटो ओळी
२३०७२०२१-आयसीएच-०२
इचलकरंजी पंचगंगा नदीवरील पुलावरील आमदार प्रकाश आवाडे यांनी पाहणी करत पालिकेचे आपत्कालीन विभागप्रमुख संजय कांबळे यांच्याकडून पूरपरिस्थितीची माहिती घेतली.