वणवा विझविणाऱ्या तरुणांसाठी सरसावले मदतीचे हात, आगीत जळाली दुचाकी; दुचाकीसाठी जमवतायत पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 12:47 PM2023-03-03T12:47:50+5:302023-03-03T12:48:09+5:30

आग विझविण्याच्या प्रयत्न करत असताना मोटरसायकल जळून खाक झाली

Citizens lend a helping hand to compensate for burnt motorcycles while fighting wildfires | वणवा विझविणाऱ्या तरुणांसाठी सरसावले मदतीचे हात, आगीत जळाली दुचाकी; दुचाकीसाठी जमवतायत पैसे

वणवा विझविणाऱ्या तरुणांसाठी सरसावले मदतीचे हात, आगीत जळाली दुचाकी; दुचाकीसाठी जमवतायत पैसे

googlenewsNext

उत्कर्षा पोतदार

उत्तुर : बेलेवाडी घाटात बुधवारी दुपारी वणवा विझविताना जळलेल्या मोटरसायकलची भरपाई करून देण्यासाठी रवळनाथ हाऊसिंग फायनान्स सोसायटीसह कोल्हापूर येथील पर्यावरणप्रेमी पुढे सरसावले आहेत. गिरीश कुंभार व विक्रम कुंभार यांना मोटरसायकल घेऊन देण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.

बेलेवाडी घाटात नवकृष्णा व्हॅली स्कूलजवळ वणवा पेटला होता. त्यावेळी आजरा येथील गिरीश प्रकाश कुंभार ( वय २६) व विक्रम प्रकाश कुंभार (वय २४) हे दोघे सख्खे भाऊ आजऱ्याहून पिंपळगाव येथे नातेवाईकांकडे जात होते. वणवा असाच सुरू राहिला तर जवळ असलेल्या विजेच्या ट्रान्सफॉर्मरला धोका होता, शॉर्टसर्किटची भीती होती. हे पाहून क्षणाचाही विलंब न करता या दोन भावांनी मोटरसायकल रस्त्याकडेला थांबून आग विझविण्यास सुरुवात केली. 

विजेच्या ट्रान्सफॉर्मरकडे जाणारी आग विझविण्याच्या प्रयत्न करत असताना आग दुसऱ्या बाजूने येऊन रस्त्यावर उभ्या केलेल्या मोटरसायकलजवळ पोहोचली व त्यात त्यांची मोटरसायकल जळून खाक झाली. याबाबतचे सविस्तर वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. ही बातमी वाचून कोल्हापूरमधील एव्हरीडे फॉर फ्युचर संस्थेचे नितीन डोईफोडे, प्रशांत कासार यांनी कुंभार यांना मोटरसायकल देण्यासाठी निधी उभारण्याचे ठरविले आहे. चार दिवसांत आपण हा निधी जमा करू, असा विश्वास नितीन डोईफोडे यांनी व्यक्त केला. दरम्यान, रवळनाथ हाऊसिंग फायनान्स सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनीही मोटरसायकल खरेदीसाठी दहा हजार रुपये देण्याचे जाहीर केले.

रवळनाथचा मदतीचा हात कायम

गडहिंग्लज येथील श्री रवळनाथ फायनान्स सोसायटी जळीतग्रस्तांना मदतीसाठी कायम पुढे असते. यावेळीसुद्धा संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी कामात व्यस्त असतानाही फोनवरच दहा हजार रुपये देण्याची घोषणा केली.

गिरीश विज्ञानाचा पदवीधर

गिरीश याने आजरा महाविद्यालयातून विज्ञान शाखेची पदवी मिळवली आहे. गेली दोन वर्षे तो गोवा येथील खासगी कंपनीत नोकरी करतो. नातेवाईकांना भेटून दोनच दिवसात तो नोकरीवर रुजू होणार होता.

Web Title: Citizens lend a helping hand to compensate for burnt motorcycles while fighting wildfires

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.