साठ वर्षांवरील नागरिकांना लसीचे पहिले डोस सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:19 AM2021-06-05T04:19:01+5:302021-06-05T04:19:01+5:30

कोल्हापूर : महापालिकेमार्फत शुक्रवारी शहरात दहा प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांतून, तसेच सीपीआर रुग्णालयात ६० वर्षांवरील ५७४ नागरिकांना कोविशिल्ड ...

Citizens over 60 years of age start the first dose of the vaccine | साठ वर्षांवरील नागरिकांना लसीचे पहिले डोस सुरू

साठ वर्षांवरील नागरिकांना लसीचे पहिले डोस सुरू

Next

कोल्हापूर : महापालिकेमार्फत शुक्रवारी शहरात दहा प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांतून, तसेच सीपीआर रुग्णालयात ६० वर्षांवरील ५७४ नागरिकांना कोविशिल्ड व कोव्हॅक्सिनचा पहिला डोस व ११० नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला.

शहरात पहिला व दुसरा डोस मिळून ६८४ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. यामध्ये प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले हॉस्पिटल येथे १४२, फिरंगाई ७०, राजारामपुरी सात, पंचगंगा ११, कसबा बावडा ६६, महाडिक माळ १०, आयसोलेशन २४ , सदरबाजार १०, सिद्धार्थनगर ६०, मोरे मानेनगर ११२ व सीपीआर हॉस्पिटल येथे १७२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. आतापर्यंत शहरात एक लाख १७ हजार ६२७ नागरिकांना पहिल्या डोसचे, तर ४१ हजार १८७ नागरिकांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे.

कोविशिल्डचा पहिला डोस घेतलेल्या आणि ८४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना कोविशिल्डच्या दुसऱ्या डोस घेण्यासाठी शनिवारी महापालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर दिला जाणार आहे. तसेच ६० वर्षांवरील ज्या नागरिकांनी रजिस्ट्रेशन केले नाही, अशा नागरिकांचे केंद्रावरच नोंदणी करून लसीकरण करण्यात येणार आहे.

Web Title: Citizens over 60 years of age start the first dose of the vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.