रोजच्या पाच तासांच्या वाहतूक कोंडीने रुक्मिणीनगरातील नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:41 AM2021-02-06T04:41:48+5:302021-02-06T04:41:48+5:30

कोल्हापूर : वन-वे (एकेरी मार्ग) चा नियम धाब्यावर बसवित यु-टर्नबाबतच्या मनाईचे उल्लंघन करत वाहने सुसाटपणे दामटत नेणाऱ्या बेशिस्त वाहनधारकांमुळे ...

Citizens of Rukmini Nagar harassed by five hours daily traffic jam | रोजच्या पाच तासांच्या वाहतूक कोंडीने रुक्मिणीनगरातील नागरिक हैराण

रोजच्या पाच तासांच्या वाहतूक कोंडीने रुक्मिणीनगरातील नागरिक हैराण

Next

कोल्हापूर : वन-वे (एकेरी मार्ग) चा नियम धाब्यावर बसवित यु-टर्नबाबतच्या मनाईचे उल्लंघन करत वाहने सुसाटपणे दामटत नेणाऱ्या बेशिस्त वाहनधारकांमुळे रुक्मिणीनगरमध्ये रोज पाच तास वाहतुकीची कोंडी होत आहे. शेकडो वाहनांची वर्दळ, त्यांचे वाजणारे हॉर्न, आदींमुळे येथील नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत पोलीस प्रशासनाकडे गेल्या दहा वर्षांपासून पाठपुरावा करूनही वाहतुकीच्या कोडींचा त्रास कमी झालेला नाही.

रुक्मिणीनगर ते निरामय हॉस्पिटलपर्यंतचा (वायचळ पथ ते रुईकर कॉलनी मार्गाला जोडणारा मार्ग) एक किलोमीटर अंतराचा हा रस्ता २० फुटी आहे. या नगरातील हा अंतर्गत रस्ता आहे. मात्र, तावडे हॉटेल, मार्केट यार्डकडून येणारे वाहनधारक लिशा हॉटेल चौक, महाडिक वसाहत आणि ताराराणी चौकातील सिग्नल चुकविण्यासाठी, तर टेंबलाईवाडी उड्डाणपूल, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, सीबीएस स्टँडकडून येणारे सर्रास वाहनधारक हे शॉर्टकट म्हणून रुक्मिणीनगरातील मार्गाचा वापर करतात. त्यात दुचाकी, चारचाकी, स्कूलबस, मालवाहतुकीचे टेम्पो, अवजड वाहनांचा समावेश आहे. या मार्गावर सकाळी साडेसात ते साडेनऊ आणि सायंकाळी साडेपाच ते रात्री साडेआठ या वेळेत वाहतुकीची कोंडी निर्माण होते. त्याचा त्रास होत असल्याने येथील नागरिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यांना येथील वाहतुकीला शिस्त लावण्याच्या मागणीची निवेदने दिली. त्यावर गेल्या पाच महिन्यांपूर्वी रक्मिणीनगरातून उड्डाण पुलाकडे जाण्यासाठी हा मार्ग वन-वे केला. त्यासह याठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचारी नियुक्त केला. मात्र, वाहनधारक हे वाहतूक पोलीस कर्मचारी त्याठिकाणी असेपर्यंतच वन-वे, यु-टर्न मनाई या नियमांचे पालन करतात. संबंधित कर्मचारी नसला की, वाहनधारक नियम धाब्यावर बसवून वाहने दामटतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन त्याचा येथील नागरिकांना त्रास होत आहे. (पूर्वार्ध)

चौकट

घरातून बाहेर पडणे मुश्कील

रुक्मिणीनगरमधील या मार्गालगत सध्या सुमारे पाचशे नागरिक राहतात. उड्डाणपूल होण्यापूर्वी या मार्गावर परिसरातील नागरिकांशिवाय क्वचितच बाहेरील वाहने यायची. त्यामुळे येथून परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिक मॉर्निंग, इव्हिनिंग वॉक करायचे. मात्र, आता रोज पाच तास होणारी वाहतुकीची कोंडी, सुसाटपणे जाणाऱ्या वाहनांमुळे येथील नागरिकांना घरातून बाहेर पडणे, तेथून चालत जाणे मुश्किलीचे झाले आहे.

Web Title: Citizens of Rukmini Nagar harassed by five hours daily traffic jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.