अतिवृष्टीच्या काळात नागरिकांनी दक्षता घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:15 AM2021-07-22T04:15:56+5:302021-07-22T04:15:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात दि.२१ ते दि. २४ जुलै दरम्यान अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने ...

Citizens should be vigilant during heavy rains | अतिवृष्टीच्या काळात नागरिकांनी दक्षता घ्यावी

अतिवृष्टीच्या काळात नागरिकांनी दक्षता घ्यावी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात दि.२१ ते दि. २४ जुलै दरम्यान अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे अतिवृष्टीच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घ्यावी, स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.

अंदाजित पाऊसमानानुसार नदी व नाल्यांच्या पात्रातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने शहरातील पूरबाधित क्षेत्रासह नदी काठावरील गावांतील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी. संभाव्य पूरस्थितीची जाणीव झाल्यास तत्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. नागरिकांनी संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद करून अलग करून ठेवावीत. नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजेच्या खांबांपासून लांब रहावे. उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये. अतिवृष्टी कालावधीत झाडे पडणे, घर किंवा इमारत कोसळणे, दरडी कोसळणे अशी आपत्ती घडण्याची शक्यता असते. अशावेळी नागरिकांनी सतर्क रहावे, असे क्षीरसागर यांनी आवाहन केले आहे.

Web Title: Citizens should be vigilant during heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.