वीज जोडणी तोडल्याने नागरिकांचे ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:20 AM2021-07-17T04:20:47+5:302021-07-17T04:20:47+5:30
इचलकरंजी : थोरात चौक परिसरातील थकीत वीज बिलापोटी अकरा घरांमधील वीज जोडणी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तोडली. त्यामुळे तेथील नागरिकांनी महावितरण ...
इचलकरंजी : थोरात चौक परिसरातील थकीत वीज बिलापोटी अकरा घरांमधील वीज जोडणी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तोडली. त्यामुळे तेथील नागरिकांनी महावितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत वीज जोडणी जोडणार नाही, तोपर्यंत उठणार नाही, असे म्हणत अभियंत्याच्या कार्यालयामध्येच ठिय्या मारला. इंदिरानगरमध्ये ३० टक्के नागरिकांना वाढीव वीज बिल आल्याने त्यांनी ते भरले नाही. शुक्रवारी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अकरा घरांतील वीज जोडणी तोडली. यामुळे तेथील संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून अभियंत्यांना धारेवर धरत प्रश्नांचा भडिमार केला. यावेळी एका अधिकाऱ्याने मोबाइल रिचार्ज करता, मग वीज बिल का थकवता, असा प्रश्न करताच नागरिक आणखीनच संतप्त झाले. यावेळी अधिकाऱ्याने किमान समान हप्त्याची सवलत देऊन वीज जोडण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले.