गडहिंग्लज शहराची हद्दवाढ बारगळली!
By admin | Published: September 23, 2014 09:38 PM2014-09-23T21:38:51+5:302014-09-24T00:09:18+5:30
पुन्हा नव्याने प्रस्ताव सादर करावा लागणार
राम मगदूम - गडहिंग्लज नगरपालिकेची हद्दवाढ करण्याबाबतची राज्य शासनाची उद्घोषणा होऊन विहीत मुदतीचा कालावधी उलटून गेल्यामुळे शहराची हद्दवाढ तूर्तास बारगळली आहे. त्यामुळे हद्दवाढीसाठी पुन्हा नव्याने प्रस्ताव सादर करावा लागणार आहे.
गडहिंग्लज शहर हे जिल्हा प्रशासनाचे मध्यवर्ती केंद्र असून, सर्व शासकीय व विभागीय कार्यालये याठिकाणी आहेत. कोकणसह सीमाभागाजवळचे प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध असणारे गडहिंग्लज शहर आता शैक्षणिक व वैद्यकीय केंद्र म्हणूनदेखील नावारूपास आले आहे. अलीकडे गडहिंग्लज शहरालगतच्या बड्याचीवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत अनेक वसाहती वसल्या आहेत. उत्पन्नाच्या मर्यादेमुळे या वसाहतींना वीज, पाणी, रस्ते, आदी मूलभूत सुविधा पुरविणे बड्याचीवाडी ग्रामपंचायतीला केवळ अशक्य आहे. त्यामुळे उपनगरी वसाहतीसह शहरातील नागरी सुविधांचा मोठा ताण नगरपालिकेवर पडत असून, शहराचा विकासच खुंटला आहे. नागरिकांच्या मागणीनुसार शहराच्या विकासाची कोंडी फोडण्यासाठीच हद्दवाढीची उद्घोषणा झाली. त्याबाबत हरकती व सूचना मागविल्या. नगरपालिकेसह तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयांकडून अहवालावर अहवाल गेले. सचिव व मंत्रीपातळीवर बैठकाही झाल्या. हद्दवाढ कृती समितीसह नगरपालिकेने पाठपुरावा केला. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी हद्दवाढ मंजुरीची अपेक्षा गडहिंग्लजकरांना होती. मात्र, ती फोल ठरली.
पाठपुरावा, इच्छाशक्तीचा अभाव !
बड्याचीवाडी ग्रामपंचायतीपासून पंचायत समिती व जिल्हा परिषदेचा ठराव मिळविण्यासाठी यातायात करावी लागली. दरम्यान, हद्दवाढीच्या मंजुरीची अंतिम अधिसूचना जारी करण्याची विहीत मुदत जानेवारीतच संपली. नियोजनशून्य पाठपुरावा व प्रबळ राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळेच गडहिंग्लज शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव बारगळला.
गडहिंग्लजची लोकसंख्या
सन लोकसंख्या
१९९१२२,३८६
२००१२५,३५६
२०११२७,५३७
गडहिंग्लजची लोकसंख्या
सन लोकसंख्या
१९९१२२,३८६
२००१२५,३५६
२०११२७,५३७
२१/१/२००८ :
हद्दवाढीची उद्घोषणा
१७/९/२००८ :
जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल
१२/४/२०१० :
बड्याचीवाडी ग्रामपंचायतीचा ठराव
२६/८/२०१० :
पंचायत समितीचा ठराव
३/९/२०११ :
जि.प. स्थायी समितीचा ठराव