महामॅरेथॉनमध्ये ‘मी धावणार, तुम्हीही धावा’ शहर पोलीस उपअधीक्षक : ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये सहभागाचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 01:06 AM2018-01-31T01:06:27+5:302018-01-31T01:08:51+5:30
कोल्हापूर : ‘लोकमत’तर्फे रविवारी (१८ फेबु्रवारी) आयोजित केलेली महामॅरेथॉन ही कोल्हापूरसह परिसरातील धावपटूंसाठी एक मोठे व्यासपीठ ठरणार आहे. मी स्वत:ही धावणार आहे. तुम्ही धावावे.
कोल्हापूर : ‘लोकमत’तर्फे रविवारी (१८ फेबु्रवारी) आयोजित केलेली महामॅरेथॉन ही कोल्हापूरसह परिसरातील धावपटूंसाठी एक मोठे व्यासपीठ ठरणार आहे. मी स्वत:ही धावणार आहे. तुम्ही धावावे. आरोग्यासाठी धावणे हितकारक असते, असे मत शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी मंगळवारी व्यक्त केले.
अमृतकर म्हणाले, धावणे हे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. याशिवाय धावपळीच्या जगात मन प्रफुल्लित ठेवण्यासाठी धावणे गरज बनली आहे. धावण्यामुळे निसर्गाशी एक नाते जुळते. त्यामुळे मीही रविवारी (दि.१८ फेबु्रवारी) ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये धावणार आहे. तुम्हीही धावावे. वेगवेगळ्या वयोगटांतील, घटकांतील लोक एकत्र येणे हा चांगला संदेश आहे. महामॅरेथॉन हा चैतन्याचा सोहळा आहे. त्यामुळे अनेक लोक ‘लोकमत’शी जोडले गेले आहेत. त्यांपैकीच मीही एक आहे.
खेळाडूंना या मॅरेथॉनमुळे एक व्यासपीठ मिळणार आहे. यात सहभाग नोंदविणे आणि मॅरेथॉनचा आनंद उपभोगणे ही एक संधी आहे. खास करून युवा वर्गाने धावण्यासारखा व्यायाम करणे आजच्या काळात
गरजेची बाब बनली आहे. स्पर्धात्मक परीक्षा देताना पोलीस खाते, वन खाते, आदी क्षेत्रांत
प्रवेश करताना शारीरिक कस पाहिला जातो.
यात धावण्याचीही शर्यत नव्हे, तर परीक्षाच असते. त्यात कमीत कमी वेळेची नोंद या परीक्षेत घेतली जाते आणि जो कमी वेळेत ठरविलेले अंतर पार करतो, तोच स्पर्धात्मक परीक्षेत यशस्वी होतो. त्यामुळे महामॅरेथॉन हे युवकांसाठी व्यासपीठ ठरणार आहे, त्याचा लाभ त्यांनी घ्यावा.
सहा लाख रुपयांची बक्षिसे
सर्वाधिक बक्षिसे जिंकण्याची संधी केवळ ‘लोकमत’ महामॅरेथॉनमध्येच आहे. त्यामुळे त्वरा करा... स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेवटची तारीख ३ फेबु्रवारी आहे. या महामॅरेथॉनमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता.
६६६.ेंँेंं१ं३ँङ्मल्ल.ूङ्मे/‘ङ्म’ँंस्र४१ या वेबसाईटसह लोकमत शहर कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर; मोबाईल नंबर ९८८१८६७६००, ९६०४६४४४९४ वर नोंदणी करता येणार आहे.