शहरात पारंपरिक पद्धतीने बकरी ईद उत्साहात

By admin | Published: September 14, 2016 12:07 AM2016-09-14T00:07:52+5:302016-09-14T00:47:22+5:30

देशाच्या प्रगतीसाठी सामूहिक दुवा : मुस्लिम बोर्डिंगसह शहरातील विविध ठिकाणी नमाज पठण

In the city traditionally goat idiom | शहरात पारंपरिक पद्धतीने बकरी ईद उत्साहात

शहरात पारंपरिक पद्धतीने बकरी ईद उत्साहात

Next

कोल्हापूर : मुस्लिम बांधवाचा बकरी ईद (ईद-उल-अजहा) सण कोल्हापुरात सालाबादप्रमाणे पारंपरिक पद्धतीने व धार्मिक वातावरणात मंगळवारी साजरा झाला. शहरात दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंगमधील पटांगणासह शहरातील विविध मशीदच्या ठिकाणी नमाज पठण करण्यात आले. बकरी ईदनिमित्त मुस्लिमबांधव एकत्र जमले. यावेळी मुस्लिमबांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या. नमाज पठणानंतर मानव कल्याण व विश्वशांती तसेच देशाच्या प्रगतीसाठी सामूहिक दुवा (प्रार्थना) करण्यात आली.
शहरात मंगळवारी सकाळी इब्राहिम खाटिक चौकातील कसाब मशीद, महाराणा प्रताप चौकातील अहिले हदिस मशीद, सदर बझार मशीद, टाऊन हॉल येथील राजेबागस्वार मशीद , बाराईमाम मशीद, उत्तरेश्वर पेठेतील जुम्मा मशीद, बिडी कॉलनी मशीद, गवंडी मोहल्ला मशीद, केसापूर मशीद (ब्रह्मपुरी), मणेर मशीद, शहाजमाल मशीद, रंकाळा मशीद, मदिना मशीद, बागल चौक येथील कब्रस्तान मशीद , प्रगती कॉलनी मशीद, शाहूपुरी मशीदसह शिरोली मदरसा, बडी मशीद, बिंदू चौक, लक्षतीर्थ वसाहत येथील विश्वास कॉलनी मदरसा, सिरतनगर मोहल्ला मशीद, कसबा बावडा शाहीनामे मशीद , विक्रमनगरमधील घुडणपीर मशीद आदी ठिकाणी नमाज पठण झाले.
दरम्यान, मुस्लिम बोर्डिंगच्या पटांगणावर दुसऱ्या जमातच्या नमाजकरिता हाफिज आकिब म्हालदार व तिसरी जमातसाठी मौलाना रहमतुल्ला कोकणे यांनी नमाज पठण केले.यावेळी शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे, लक्ष्मीपुरीचे निरीक्षक तानाजी सावंत, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, गुप्तवार्ताचे निरीक्षक निशिकांत भुजबळांच्यासह सर्वधर्मियांचे मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी, उपाध्यक्ष आदिल फरास, संचालक पापाभाई बागवान, लियाकत मुजावर, साजिद खान, अमीर हमजेखान शिंदी ,जहाँगीर अत्तार, मुसा पटवेगार, रफिक मुल्ला, अल्ताफ झांजी, मलिक बागवान यांच्या हस्ते शिरखुर्म्यांचे वाटप करण्यात आले.


राजकीय नेत्यानी किरवली पाठ...
दरवर्षी बकरी ईदवेळी शहरातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसह लोकप्रतिनिधी मुस्लिम बोर्डिंगमध्ये हजेरी लावतात. यंदा मात्र,कोणत्याही पक्षांचे नेते अथवा लोकप्रतिनिधी फिरकले नसल्याचे दिसून आले. यावर्षी कोणतीही निवडणूक नसल्यामुळे नेते या ठिकाणी आले नसल्याचे यावेळी चर्चा होती.
मुलांमध्ये उत्साह...
मुस्लिम बोर्डिंगमध्ये मंगळवारी सकाळपासूनच मुस्लिमबांधवांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यांच्यासह मुलांचा समावेश होता. त्यामुळे याठिकाणी उत्साहाचे वातावरण होते.

Web Title: In the city traditionally goat idiom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.