शहर विकासाचा मास्टर प्लान करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:19 AM2021-04-29T04:19:04+5:302021-04-29T04:19:04+5:30
कोल्हापूर : यापुढील काळात शहराच्या विकासाचा मास्टर प्लान तयार करून नियोजनबद्ध विकास करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल, असे प्रतिपादन ...
कोल्हापूर : यापुढील काळात शहराच्या विकासाचा मास्टर प्लान तयार करून नियोजनबद्ध विकास करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल, असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केले.
शहराचा विकास व्हावा, पर्यायाने शहरवासीयांना मूलभूत सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी सातत्याने माझे प्रयत्न सुरू असून, त्याचाच भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी १५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून मंगळवार पेठेतील कैलासगडची स्वारी मंदिरांतर्गत विकास कामांचा प्रारंभ करण्यात आला. यामध्ये देवणे गल्ली रस्ता पेव्हर पद्धतीने डांबरी करणे (६ लाख ८३ हजार), कोष्टी गल्ली नं.२ येथील रस्ता पेव्हर पद्धतीने डांबरी करणे (५ लाख ५० हजार) आणि राम गल्ली रस्ता पेव्हर पद्धतीने डांबरी करणे (७ लाख ६७ हजार) एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, उपशहरप्रमुख जयवंत हारुगले, दीपक गौड, विभाग प्रमुख गजानन भुर्के, रणजित मंडलिक, रमेश मोरे, श्वेता अभिषेक देवणे, अश्विनी फडतारे, सारिका गायकवाड, प्रियांका झगडे, सुनीता सासने, सुनीता मोरे, मालन शिंदे, दीपा कालेकर आदी उपस्थित होते.
फोटो क्रमांक - २८०४२०२१-कोल-राजेक्ष क्षीरसागर
ओळ - कोल्हापूर महानगरपालिकेला मिळालेल्या १५ कोटींच्या निधीतील काही कामांचा बुधवारी मंगळवारपेठेत प्रारंभ करण्यात आला. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे उपस्थित होते.