नागरी सुविधा केंद्र आता दोन तास जादा सेवा देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 02:18 PM2020-06-01T14:18:49+5:302020-06-01T14:20:13+5:30
सर्व नागरी सुविधा केंद्र ३० जूनपयंत सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यत सुरू ठेवण्याबाबतचे आदेश दिले. ३० जूनपर्यंत सहा टक्के सवलत आहे. केंद्रासमोर सोशल डिस्टन्सिंग पट्टे मारण्याचे तसेच मंडप उभा करण्याचे आदेश दिले.
कोल्हापूर : महापालिकेचे नागरी सुविधा केंद्र आता दोन तास जादा सेवा देणार आहे. घरफाळा जमा करण्यासाठी सहा टक्के सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांची केंद्रासमोर रांगा लागल्या आहेत. सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी होत नसल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे केंद्राचा अवधी ३० जूनपर्यंत वाढविण्यात आला असून, आता सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत सुरू राहणार असल्याचे माहिती आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली आहे.
आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी रविवारी घरफाळा विभागाचा निवडणूक कार्यालयात आढावा घेतला. यावेळी आयुक्तांनी सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग रजपूत व कर निर्धारक व संग्राहक संजय भोसले यांना घरफाळा सवलतीचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना होण्यासाठी सर्व नागरी सुविधा केंद्र ३० जूनपयंत सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यत सुरू ठेवण्याबाबतचे आदेश दिले. ३० जूनपर्यंत सहा टक्के सवलत आहे. केंद्रासमोर सोशल डिस्टन्सिंग पट्टे मारण्याचे तसेच मंडप उभा करण्याचे आदेश दिले.
नवीन मिळकती शोधा
विभागीय कार्यालय १ ते ४ अंतर्गत येणारे घरफाळा विभागांतर्गत नवीन मिळकती शोधण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना उद्दिष्ट्य देण्याचे आदेश आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी करनिर्धारक संजय भोसले यांना दिले.
गतवर्षाचा दंड माफ
लॉकडाऊनमुळे मागील वर्षातील घरफाळा ३१ मार्च २०२० पर्यत जमा न केलेल्या नागरिकांना हा घरफाळा ३० जून २०२० पर्यत भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. मागील वर्षातील घरफाळ्यावर ३० जून अखेर कोणत्याही दंडाची आकारणी करण्यात येणार नाही.