पुजाऱ्यांवरील निर्णयाविरोधात दावा दाखल करणार : - दिलीप पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 01:36 PM2019-04-10T13:36:37+5:302019-04-10T13:41:07+5:30
अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नियुक्तीचा कायदा राज्य शासनाने केला आहे. त्याच्या अंमलबजावणी विरोधात न्यायालयाने श्रीपूजकांच्या बाजूने देण्यात आलेल्या निकाला
कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नियुक्तीचा कायदा राज्य शासनाने केला आहे. त्याच्या अंमलबजावणी विरोधात न्यायालयाने श्रीपूजकांच्या बाजूने देण्यात आलेल्या निकाला विरोधात आम्ही दावा दाखल करू अशी माहिती श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीे दिलीप पाटील यांनी दिली. वैयक्तिक स्वार्थापोटी पुजाऱ्यांशी संगनमत करून देवस्थान समितीने मुद्दाम हा दावा हरल्याचा आरोपही त्यांनी कला.
अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नियुक्ती कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत श्रीपूजकांच्या हक्कात कोणत्याही प्रकारची बाधा येईल असे कृत्य देवस्थान समितीने करू नये असा आदेश मंगळवारी वरिष्ठ जिल्हा दिवाणी न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी संघर्ष समितीचे दिलीप पाटील, सचिन तोडकर, स्वप्निल पार्टे व शुभम शिरहट्टी यांनी बुधवारी देवस्थान समितीचे कार्यालय गाठले. यावेळी अध्यक्ष व सचिव नसल्याने त्यांनी सहसचिव एस. एस. साळवी यांना धारेवर धरले. साळवी यांनी कार्यकर्त्यांना सचिव विजय पोवार यांना दुरध्वनीवर संपर्क साधून दिला.
यावेळी दिलीप पाटील यांनी पुजारी न्यायालयात गेल्यास आम्हाला पार्टी करून घ्यावे यासाठी आम्ही उच्च न्यायालयात कॅवेट दाखल केले आहे. दिवाणी न्यायालयात पूजाºयाने दावा दाखल केल्याची माहिती संघर्ष समितीला का देण्यात आली नाही. समितीने या केससाठी निष्णात वकिल नेमण्याऐवजी ज्युनिअर वकिल का दिला अशी विचारणा केली. या निर्णयाविरोधात आम्ही उच्च न्यायालयात दावा दाखल करू असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
देवस्थान जबाबदार असेल
सध्या पुजाºयांना कोणत्याही पातळीवर त्रास किंवा त्यांच्या कार्यात अडथळा होईल असे काम केले जात नाही. तरिही पूजाºयांनी मुद्दाम डिवचण्याचे काम केले आहे. जनरेटयामुळे झालेला पगारी पुजारी कायदा समितीच्या पदाधिकाºयांना नको आहे. त्यामुळेच त्यांनी पूजाºयांशी संगनमत करून श्रीपूजक अजित ठाणेकर यांच्यासाठी जाणीवपूर्वक ही केस हरली आहे. या प्रकरणानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास झाल्यास त्याला देवस्थान समिती जबाबदार असेल असा इशाराही यावेळी देण्यात आला.