Kolhapur: कुरुंदवाड येथे पोलीस ठाण्यासमोरच हाणामारी, पोलीसांचा लाठीचार्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 03:07 PM2024-05-31T15:07:12+5:302024-05-31T15:07:32+5:30

कुरुंदवाड : दत्तवाड (ता. शिरोळ) येथील नूर काले व सागर कोळी यांच्यातील झालेल्या हाणामारीची तक्रार देण्यासाठी आलेल्या कोळी गटाचे ...

Clash in front of police station in Kurundwad Kolhapur, police lathi charge | Kolhapur: कुरुंदवाड येथे पोलीस ठाण्यासमोरच हाणामारी, पोलीसांचा लाठीचार्ज

Kolhapur: कुरुंदवाड येथे पोलीस ठाण्यासमोरच हाणामारी, पोलीसांचा लाठीचार्ज

कुरुंदवाड : दत्तवाड (ता. शिरोळ) येथील नूर काले व सागर कोळी यांच्यातील झालेल्या हाणामारीची तक्रार देण्यासाठी आलेल्या कोळी गटाचे समर्थक पोलिस ठाण्यासमोरच काले याना प्रचंड हाणामारी केली . जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे पोलिस ठाण्याच्या आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून रात्री उशिरापर्यंत दोन्ही गटांचे परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

याबाबत अधिक माहिती अशी, दत्तवाड येथे नूर काले व ग्रामपंचायत सदस्या रेखा कोळी यांच्यात मोठा वाद आहे. गुरुवारी कोळी यांचे पती सागर कोळी व नूर काले यांच्यामध्ये वाद झाला होता. यावेळी काले याने कोळी याला मारहाण केल्याने रेखा कोळी यांनी काले याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी गुरुवारी रात्री पोलिस ठाण्यात आले होते. यावेळी कोळी समर्थक मोठ्या संख्येने पोलिस ठाण्यासमोर जमा झाले होते. 

याच दरम्यान नूर कालेही पोलिस ठाण्यासमोर येताच कोळी समर्थकांनी काले याला पोलिस ठाण्यासमोरच बेदम मारहाण केली. पोलिसांनी लाठीचार्ज करुन जमावाला पा़गविले त्यामुळे गुरुवारी मध्यरात्री पोलिस ठण्याच्या आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी जयसिंगपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक रोहीनी सोळुंके, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, उपनिरीक्षक सागर पवार यांच्यासह मोठा पोलिस बंदोबस्त होता. दोन्ही गटांवर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Web Title: Clash in front of police station in Kurundwad Kolhapur, police lathi charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.