कागलमध्ये दोन गटांत हाणामारी
By admin | Published: December 26, 2014 12:33 AM2014-12-26T00:33:46+5:302014-12-26T00:45:27+5:30
स्नेहसंमेलनावेळी वाद : सतराजणांविरुद्ध गुन्हा
कागल : येथील हायस्कूलच्या स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पाहण्याच्या कारणावरून येथील आंबेडकनगर आणि कोष्टी गल्लीमधील तरुणांच्या गटात झालेल्या हाणामारीप्रकरणी कागल पोलिसांत आज, गुरुवारी कोष्टी गल्लीतील दहा युवकांच्या विरोधात जातिवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे, तर आंबेडकरनगरमधील सात तरुणांविरुद्ध हाणामारीचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गैबी चौकात घडली. हे स्नेहसंमेलन शाहू हॉलमध्ये होते.
कोष्टी गल्लीतील ऋषिकेश चव्हाण आणि सुमित माळी हे जखमी झाल्याने ते खासगी दवाखान्यात दाखल झाले होते. ऋषिकेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलिसांनी रोशन कांबळे, गुंडा कांबळे, सचिन सोनुले, विकी कांबळे, अमित कांबळे, राहुुल श्रीवास्तव (सर्व आंबेडकरनगर, कागल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
त्यानंतर आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, मंगलराव माळगे, कार्यकर्ते कागल पोलिसांत एकत्र आले. कागल पोलिसांनी अमित प्रभाकर कांबळे यांच्या तक्रारीवरून संदीप चव्हाण, राहुल चव्हाण, शिवराज पसारे, रोहित बागल, विजय दळवी, शुभम चव्हाण, प्रवीण बारड, संतोष पवार, किरण दळवी, ओंकार मर्दाने (रा. सर्व कागल) यांच्याविरुद्ध जातिवाचक शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.