इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील इयत्ता पाचवीपासूनचे वर्ग भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:29 AM2021-08-18T04:29:22+5:302021-08-18T04:29:22+5:30

राज्य शासनाच्या आदेशानुसार, दि. १ जुलैपासून इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील इयत्ता आठवी ते दहावीचे वर्ग ऑफलाईन पद्धतीने सुरू झाले. जिल्ह्यामध्ये ...

Classes from class five in English medium schools are full | इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील इयत्ता पाचवीपासूनचे वर्ग भरले

इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील इयत्ता पाचवीपासूनचे वर्ग भरले

Next

राज्य शासनाच्या आदेशानुसार, दि. १ जुलैपासून इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील इयत्ता आठवी ते दहावीचे वर्ग ऑफलाईन पद्धतीने सुरू झाले. जिल्ह्यामध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून रुग्णसंख्या पाचशेच्या आत आली आहे. त्यामुळे आठवी ते दहावीप्रमाणे इयत्ता पाचवी ते सातवी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याची मागणी पालकांनी केली. त्यांनी त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठविण्याबाबत संमतीपत्र दिले. त्यानुसार संस्थाचालकांनी मंगळवारपासून वर्ग ऑफलाईन पद्धतीने सुरू केले. सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर या कोरोनाच्या नियमांचे पालन करत विद्यार्थ्यांनी वर्गामध्ये हजेरी लावली. सकाळी अकरा ते दुपारी तीन यावेळेत शाळा सुरू राहिल्या. ऑफलाईन पद्धतीने वर्ग भरल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. वर्षभरानंतर वर्ग प्रत्यक्षात भरल्याने काही विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यास आणि घरी नेण्यास पालक आले होते.

प्रतिक्रिया

पालकांनी संमतीपत्रे दिल्याने इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले. प्रत्येक वर्गात साधारणत: ६५ ते ७० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. त्यामध्ये वाढ होईल.

-महेश पोळ, अध्यक्ष, कोल्हापूर इंग्लिश मेडियम स्कूल असोसिएशन

चौकट

ग्रामीण भागातील बहुतांश शाळा

शहरातील अनेक शाळांनी राज्य शासनाने स्पष्ट आदेश दिल्यानंतरच वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मंगळवारपासून सुरू झालेल्या बहुतांश शाळा या उपनगर आणि ग्रामीण भागांतील आहेत.

फोटो (१७०८२०२१-कोल-शाळा सुरू ०१, ०२) : कोल्हापुरात मंगळवारी विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावरील इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या. पेठवडगाव येथील जिनियस इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये इयत्ता पाचवीचा वर्ग ऑफलाईन पद्धतीने भरला.

170821\17kol_4_17082021_5.jpg~170821\17kol_5_17082021_5.jpg

फोटो (१७०८२०२१-कोल-शाळा सुरू ०१, ०२) : कोल्हापुरात मंगळवारी विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित तत्वावरील इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या. पेठवडगाव येथील जिनियस इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये इयत्ता पाचवीचा वर्ग ऑफलाईन पध्दतीने भरला.~फोटो (१७०८२०२१-कोल-शाळा सुरू ०१, ०२) : कोल्हापुरात मंगळवारी विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित तत्वावरील इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या. पेठवडगाव येथील जिनियस इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये इयत्ता पाचवीचा वर्ग ऑफलाईन पध्दतीने भरला.

Web Title: Classes from class five in English medium schools are full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.