कोल्हापूर ते सांगली रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:18 AM2021-06-26T04:18:54+5:302021-06-26T04:18:54+5:30

जयसिंगपूर : बहुचर्चित असलेला कोल्हापूर (शिरोली) ते सांगली रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्यात आला आहे. केंद्र सरकारने शिरोली ते ...

Classes from Kolhapur to Sangli Road National Highway | कोल्हापूर ते सांगली रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग

कोल्हापूर ते सांगली रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग

googlenewsNext

जयसिंगपूर : बहुचर्चित असलेला कोल्हापूर (शिरोली) ते सांगली रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्यात आला आहे. केंद्र सरकारने शिरोली ते सांगली व हडपसर ते निरा मार्ग हे दोन रस्ते राष्ट्रीय महामार्गामध्ये सामावून घेतले आहेत, अशी माहिती राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली. खासगीकरणांतर्गत बांधा वापरा व हस्तांतरित करावयाच्या तत्वावर करण्यात येणाऱ्या कोल्हापूर (शिरोली) ते सागंली रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाचे ठेकेदार न्यायालयात गेल्यामुळे मागील अनेक वर्षापासून हे काम ठप्प होते. राज्य शासन व महाविकास आघाडी सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे हा रस्ता नुकताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या रस्त्याचे काम संपूर्ण काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून गतीने होईल, असे सांगून राज्यमंत्री यड्रावकर म्हणाले, न्यायालयीन प्रक्रियेमुळे महामार्गाचे काम खोळंबले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील दालनात झालेल्या बैठकीत ठेकेदाराच्या देयकाबाबतीत न्यायालय न्यायालय राज्य शासनावर जी जबाबदारी निश्चित करेल ती राज्य शासनाकडून पूर्ण केली जाईल, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले होते. यावेळी महाराष्ट्रातील बीओटी तत्त्वावर होणारे असे तेरा मार्ग राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाकडे वर्ग करावेत असेदेखील निश्चित झाले होते. यानंतर राज्य शासनाने या सर्व रस्त्यांचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाकडे अटी व शर्तीसह सुपूर्द केला होता.

------------------------

चौकट - रस्ता मजबुतीकरणाला गती मिळणार

कोल्हापूर-शिरोली-सांगली या रस्त्याचे अनेक वर्षे प्रलंबित असलेले मजबुतीकरणाचे हे काम हा संपूर्ण रस्ता राष्ट्रीय महामार्ग जीवन प्राधिकरणाकडे गेल्यामुळे या रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊन रस्ता मजबुतीकरणाच्या गती मिळणार असल्याचेही राज्यमंत्री डॉ. यड्रावकर यांनी सांगितले.

------------------------

मंत्री यड्रावकर यांचा पाठपुरावा

मागील अनेक वषार्पासून बीओटी तत्त्वावर काम करणाऱ्या या रस्त्याचे ठेकेदार न्यायालयात गेल्यामुळे रस्त्याचे काम अनेक ठिकाणी अर्धवट राहिले आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या रहदारीमुळे अपघाताच्या प्रमाणात मोठी वाढ झाली होती. एकूणच हा संपूर्ण मार्ग प्रवासासाठी अडचणीचा ठरत होता. यासाठी आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी पाठपुरावा करून हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग रस्ते प्राधिकरणाकडे वर्ग करावा, यासाठीचा आग्रह धरला होता.

- डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर,

फोटो - २५०६२०२१-जेएवाय-०४-डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर

Web Title: Classes from Kolhapur to Sangli Road National Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.