क्लॅक्स सोल्यूशन मयूर स्पोर्टस्, फायटर्स विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:22 AM2021-03-19T04:22:30+5:302021-03-19T04:22:30+5:30
शाहू क्रीडांगण, कागल येथे झालेल्या सामन्यात क्लॅक्स सोल्यूशन मयूर संघाने प्रथम फलंदाजी करीत ३९.५ षटकांत ३२८ धावांचा डोंगर रचला. ...
शाहू क्रीडांगण, कागल येथे झालेल्या सामन्यात क्लॅक्स सोल्यूशन मयूर संघाने प्रथम फलंदाजी करीत ३९.५ षटकांत ३२८ धावांचा डोंगर रचला. यात कपिल धर्माधिकारीने १०९, जयदीप पाटीलने ७४, सिराज शेखने नाबाद ३३ आणि वैभव पाटीलने १९, रोहित उंडाळेने १४ धावा केल्या. मालती पाटील संघाकडून अभिजित सणगरने चार, ईश्वर घोरपडेने दोन, इजाज शेख व अब्दुलकादर देसाई यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना मयूर संघास हे आव्हान पेलवले नाही. त्यांचा सर्व संघ १५.४ षटकांत ४२ धावांत गारद झाला. क्लॅक्सकडून नझीर शेखने चार, मुकुल शहा, रेहान सनदी, शिवकुमार यादव, सिराज शेख , जयदीप पाटील यांनी भेदक गोलंदाजी करीत विजय संपादन केला.
राजाराम मैदानावर झालेल्या सामन्यात फायटर्स स्पोर्टस् क्लब ‘ब’ ने शिवाजी विद्यापीठ कर्मचारी संघाचा ८ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना शिवाजी विद्यापीठ संघाने २०.४ षटकांत सर्वबाद ८४ धावा केल्या. सागर पोवारने २५, विश्वनाथ वरूटेने २३, विक्रम कोंढावळेने ११ धावा केल्या. फायटर्सकडून सोहम घाळीने भेदक गोलंदाजी करीत पाच फलंदाजांना माघारी पाठविले, तर तुषार आसोळे, अमित शेटके यांनी प्रत्येकी दोन, तन्वीर सय्यदने एक बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना फायटर्स ‘ब’ने ११ षटकांत २ गड्यांच्या मोबदल्यात ८५ धावा करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. यात शुभम मेढेने नाबाद ३९, प्रसाद कुंभार याने नाबाद २९ धावा केल्या. विद्यापीठ संघाकडून विश्वनाथ वरूटेने दोन बळी घेतले.