खाडे महाविद्यालयात ‘स्वच्छ सुंदर हरित गाव’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:21 AM2021-02-07T04:21:44+5:302021-02-07T04:21:44+5:30

कोल्हापूर : कोपार्डे (ता. करवीर) येथील स. ब. खाडे महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्यावतीने नेहरू युवा केंद्र, कोल्हापूरमार्फत युवक कल्याण व ...

‘Clean Beautiful Green Village’ Campaign at Khade College | खाडे महाविद्यालयात ‘स्वच्छ सुंदर हरित गाव’ अभियान

खाडे महाविद्यालयात ‘स्वच्छ सुंदर हरित गाव’ अभियान

Next

कोल्हापूर : कोपार्डे (ता. करवीर) येथील स. ब. खाडे महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्यावतीने नेहरू युवा केंद्र, कोल्हापूरमार्फत युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार आयोजित ‘स्वच्छ, सुंदर, हरित गाव’ अभियान घेण्यात आले. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य बी. एम. कुंभार होते. सचिन लोंढे-पाटील, प्रा. सचिन हुजरे, आय. टी. आय. चे प्राचार्य डी. पी. भगत यांनी प्लास्टिकमुक्त गाव, औषधी वनस्पतींचे उपयोग, श्रमदानात युवकांचे योगदान, पर्यावरणावर होणारे परिणाम आणि युवकांची जबाबदारी या चार विषयांवर मार्गदर्शन केले.

सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. एस. पी. चौगले यांनी प्रास्ताविक केले. शालेय साहित्यांचे वाटपही यावेळी करण्यात आले. नेहरू युवा केंद्राचे प्रा. गणेश भोसले, पृथ्वीराज चौगुले, प्रा. दत्ता रावण, प्रा. व्ही. एम. सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : कोपार्डे (ता. करवीर) येथील स. ब. खाडे महाविद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. (फोटो-०६०२२०२१-कोल-खाडे महाविद्यालय)

Web Title: ‘Clean Beautiful Green Village’ Campaign at Khade College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.