खुल्या भूखंडांची स्वच्छता करा, अन्यथा दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:31 AM2021-08-14T04:31:00+5:302021-08-14T04:31:00+5:30

गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरातील खासगी खुल्या भूखंडांची वेळोवेळी स्वच्छता करावी, अन्यथा भूखंड मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा ...

Clean open plots, otherwise punitive action | खुल्या भूखंडांची स्वच्छता करा, अन्यथा दंडात्मक कारवाई

खुल्या भूखंडांची स्वच्छता करा, अन्यथा दंडात्मक कारवाई

Next

गडहिंग्लज :

गडहिंग्लज शहरातील खासगी खुल्या भूखंडांची वेळोवेळी स्वच्छता करावी, अन्यथा भूखंड मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा व आरोग्य समितीतर्फे देण्यात आला आहे.

डेंग्यूसदृश लक्षणाची साथ व कीटकजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर आरोग्य समितीची बैठक ऑनलाईन पार पडली. अध्यक्षस्थानी उपनगराध्यक्ष महेश कोरी होते.

शहरात अनेक खासगी मोकळ्या जागा वापराविना पडून आहेत. त्याठिकाणी गवत व झाडे-झुडपे वाढल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या तक्रारी येत असल्याने हा निर्णय एकमताने घेण्यात आला. चर्चेत विरोधी पक्षनेते हारुण सय्यद, दीपक कुराडे यांनीही भाग घेतला.

चौकट : १० सप्टेंबरची मुदत

गडहिंग्लज शहरातील खासगी खुल्या जागेवरील गवत व झाडे-झुडपे काढण्यासाठी १० सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर संबंधित जागा मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

गडहिंग्लज पालिका : १३०८२०२१-गड-१६

Web Title: Clean open plots, otherwise punitive action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.