महास्वच्छता मोहिमेत अर्धा टन कचरा व प्लास्टिक उचलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:22 AM2021-04-19T04:22:16+5:302021-04-19T04:22:16+5:30
कोल्हापूर : शहरात रविवारी झालेल्या महास्वच्छता मोहिमेत अर्धा टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. मोहिमेचा १०३ वा रविवार ...
कोल्हापूर : शहरात रविवारी झालेल्या महास्वच्छता मोहिमेत अर्धा टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. मोहिमेचा १०३ वा रविवार होता.
मोहिमेत स्वच्छता दूत अमित देशपांडे, वृक्षप्रेमी संस्था, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, महापालिकेचे अधिकारी व सफाई कर्मचारी यांनी सोशल डिस्टन्स ठेवून स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला. ही स्वच्छता मोहीम बुधवार पेठ तालीम रोड ते पंचगंगा रोड स्मशानभूमी, आयसोलेशन हॉस्पिटल परिसर, कावळा नाका ते मार्केट यार्ड मेन रोड येथे राबविण्यात आली.
वृक्षप्रेमी संस्थेमार्फत टाकाळा परिसर उद्यानामध्ये प्लास्टिक कचरा उठाव करून स्वच्छता मोहीम राबविली. राजारामपुरी टाकाळा परिसरातील उद्यान येथे झाडांचा पालापाचोळा यापासून कंपोस्ट खत तयार करण्यासाठी स्थानिक नागरिकांच्या मदतीने कंपोस्ट खड्डा करण्यात आला आहे. मोहिमेत वृक्षप्रेमी संस्थेचे अध्यक्ष अमोल बुड्ढे, सतीश कोरडे, सचिन पवार, संदीप देसाई, परितोष उरकुडे, तात्या गोवावाला, अक्षय कांबळे यांनी सहभाग घेतला. यावेळी विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, निखिल पाडळकर, दिलीप पाटणकर, शुभांगी पोवार, मुनीर फरास, करण लाटवडे, महेश भोसले उपस्थित होते.