सातार्डेतील शाहूकालीन पाझर तलावाची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:19 AM2021-06-04T04:19:07+5:302021-06-04T04:19:07+5:30

यवलूज वार्ताहर - सातार्डे (ता. पन्हाळा) येथील वाघजाई डोंगरातील शाहूकालीन ऐतिहासिक अशा ‘टाक्याचा झरा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ...

Cleaning of Shahukalin Pajar Lake in Satarde | सातार्डेतील शाहूकालीन पाझर तलावाची स्वच्छता

सातार्डेतील शाहूकालीन पाझर तलावाची स्वच्छता

Next

यवलूज वार्ताहर - सातार्डे (ता. पन्हाळा) येथील वाघजाई डोंगरातील शाहूकालीन ऐतिहासिक अशा ‘टाक्याचा झरा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पाझर तलावाची लोकसहभागातून स्वच्छता करण्यात आली. लोकराजा शाहू महाराजांनी वन्यप्राण्यांना पाण्याची सोय व्हावी या उद्देशाने या झऱ्याची निर्मिती केली होती. ग्रामपंचायत सदस्य, ग्रा. प. कर्मचारी व गावातील तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून जेसीबीने या झऱ्याची स्वच्छता केली. सुमारे ३० बाय ३० आणि १० फूट खोल असा हा पाझर तलाव असून, पावसाळ्यात तलावात पाणी साठवणूक होणार आहे. पर्यावरण संरक्षणासाठी राबवलेल्या या मोहिमेचे पर्यावरणप्रेमींमधून समाधान व्यक्त होत आहे.

यासाठी ग्रा. प. सदस्य सागर रामाणे, भास्कर कांबळे, पोलीस पाटील अशोक पाटील, अशोक नाईक, पांडुरंग पाटील, सचिन पाटील, नितीन मिसाळ, सचिन रामाणे, उमेश गुरव, मधुकर मुद्राळे, सदाशिव लाड, प्रदीप शेळके यांनी परिश्रम घेतले.

फोटो ओळ:- सातार्डे येथील पाझर तलावाची स्वच्छताप्रसंगी सागर रामाणे, भास्कर कांबळे, अशोक नाईक, पांडुरंग पाटील, सचिन पाटील, उमेश गुरव आदी उपस्थित होते.

Web Title: Cleaning of Shahukalin Pajar Lake in Satarde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.