श्री अंबाबाईच्या मुख्य गाभाºयाची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 03:42 PM2017-09-16T15:42:34+5:302017-09-16T15:43:55+5:30
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मुख्य गाभाºयाची स्वच्छता करण्यात आली. यानिमित्त वर्षातून एकदा देवीच्या अंगावर इरलं पांघरण्याची पद्धत आहे.
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मुख्य गाभाºयाची स्वच्छता करण्यात आली. यानिमित्त वर्षातून एकदा देवीच्या अंगावर इरलं पांघरण्याची पद्धत आहे. भाविकांच्या सोयीसाठी देवीची उत्सवमूर्ती महासरस्वती मंदिराजवळ दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. सायंकाळी सातनंतर देवीचे दर्शन पूर्ववत सुरु करण्यात आले.
नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच सहा दिवसांपासून अंबाबाई मंदिराची स्वच्छता सुरु आहे. अखेरच्या टप्प्यात शनिवारी देवीच्या मुख्य गाभाºयाची स्वच्छता करण्यात आली. सकाळचा अभिषेक झाल्यानंतर देवीच्या मुळ मूर्तीला इरलं पांघरण्यात आले.
याकाळात भाविकांना देवीचे दर्शन मिळावे यासाठी उत्सवमूर्ती सरस्वती मंदिराजवळ ठेवण्यात आली. दिवसभर स्वच्छता संपल्यानंतर सायंकाळी सात वाजता अभिषेक, सालंकृत पूजा व अभिषेकानंतर देवीची मूर्ती दर्शनासाठी खुली करण्यात आली.