कोल्हापूरसह राज्यातील १२ जिल्ह्यांत हवामान आधारित पीक विमा योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:17 AM2021-06-28T04:17:52+5:302021-06-28T04:17:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूरसह राज्यातील १२ जिल्ह्यांत हवामान आधारित पीक विमा योजना लागू झाली आहे. राज्य ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूरसह राज्यातील १२ जिल्ह्यांत हवामान आधारित पीक विमा योजना लागू झाली आहे. राज्य सरकारने केलेल्या या घोषणेचा लाभ कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना होणार आहे.
महाराष्ट्र सरकारने रिस्ट्रक्चर्ड वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स स्कीम (आरडब्ल्यूबीसीआयएस) सादर करण्याचे अधिकार एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी या कंपनीला प्रदान केले आहेत. कोल्हापूर, जालना, लातूर, सातारा, परभणी, ठाणे, सांगली, औरंगाबाद, बीड, हिंगोली, अकोला आणि वर्धा या जिल्ह्यांतील कर्ज घेतलेल्या तसेच कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांना २०२१ मधील खरीप हंगामासाठी ही योजना पुरवली जाईल.
१२ जिल्ह्यांतील शेतकरी खाली आरडब्ल्यूबीसीआयएसखाली विमा काढू शकतात. हा विमा नजीकची राष्ट्रीयीकृत बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, प्राथमिक कृषी सहकारी संस्था (पीएसीएस), प्रादेशिक ग्रामीण बँक/सामाईक सेवा केंद्र (सीएससी) यांच्याद्वारे काढला जाऊ शकतो किंवा शेतकरी अधिकृत एचडीएफसी एजंटशी संपर्क साधू शकतात. शेतकरी पुढील वेबसाइटवर लॉगऑन करून किंवा स्वत:ची नोंदणी करूनही विमा काढू शकतात- https://pmfby.gov.in/farmerLogin
आरडब्ल्यूबीसीआयएस हंगामी नुकसानीपासून संरक्षण देऊ करते. यामध्ये डेफिसिट रेनफॉल कव्हर (पाऊस कमी होण्याच्या परिस्थितीत संरक्षण), काँझिक्युटिव ड्राय डे कव्हर (सलग कोरडे दिवस गेल्यास संरक्षण), रिलेटिव ह्युमिडिटी कव्हर (तुलनात्मक आर्द्रता संरक्षण) आदींना महाराष्ट्र सरकारच्या कृषिखात्याने अधिसूचित केले आहे.