पन्नास मतदारसंघांतून ‘घड्याळ’ गायब होणार--

By admin | Published: January 22, 2017 12:38 AM2017-01-22T00:38:36+5:302017-01-22T00:38:36+5:30

जिल्हा परिषद निवडणूक रणांगण--आघाडीच्या राजकारणाचा फटका--वीस ठिकाणी एकच इच्छुक--नेत्यांची सोय, पक्षाची गैरसोय

'Clock' will disappear in fifty constituencies - | पन्नास मतदारसंघांतून ‘घड्याळ’ गायब होणार--

पन्नास मतदारसंघांतून ‘घड्याळ’ गायब होणार--

Next

कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने स्वबळापेक्षा बहुतांश तालुक्यांत आघाडीच करण्याचा निर्णय घेतल्याने किमान ५० जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ चिन्ह गायब होणार आहे. आघाड्यांमुळे नेत्यांची सोय होणार असली तरी यात पक्षाचे मात्र नुकसान होणार आहे.
निवडणुकीआधी तीन-चार महिने नेत्यांनी स्वबळाच्या कितीही डरकाळ्या फोडल्या तरी निवडणुकीच्या मैदानात खरे ‘बळ’ दिसत आहे. प्रत्यक्ष लढायचे झाल्यानंतर कागल, राधानगरी, भुदरगड वगळता नऊ तालुक्यांत दुसऱ्या पक्षाचा आधार घेतल्याशिवाय लढता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. शाहूवाडीत शिवसेनेशी, गगनबावड्यात कॉँग्रेससोबत, पन्हाळ्यात जनसुराज्य वगळून सगळ्यांशी, करवीरमध्ये शिवसेनेशी, हातकणंगलेत आवाडे गट व स्वाभिमानी सोडून, शिरोळमध्ये कॉँग्रेससोबत, गडहिंग्लज-चंदगडमध्ये भाजप, तर आजऱ्यामध्ये कॉँग्रेसशी आघाडी होणार, हे जवळपास निश्चित आहे. आघाडीच्या तडजोडीत जेवढ्या जागा पदरात पडणार तिथे पक्षाच्या चिन्हावर उमेदवार उभे करता आले असते; पण पक्षाच्या निरीक्षकांनीच आघाड्या केल्या तर ‘घड्याळ’ चिन्ह वापरता येणार नसल्याचा फतवा काढल्याने या नेत्यांना चांगलीच मोकळीक मिळाली आहे.
कागल, भुदरगड, राधानगरी तालुक्यांत जिल्हा परिषदेचे १४ मतदारसंघ येतात. येथेच पक्षाच्या चिन्हावर उमेदवार उभे राहणार आहेत. त्याशिवाय इतर ठिकाणी तीन-चार उभे राहिले, तर १७ ते १८ पेक्षा अधिक ठिंकाणी पक्षाचे चिन्ह दिसणार नाही. त्यात पक्षाकडे मागणी केलेल्या इच्छुकांची संख्या पाहिली तर तब्बल २० जिल्हा परिषद मतदारसंघांत केवळ एक-एकच इच्छुक आहेत. सात ठिकाणी दोघा-दोघांनी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)


एकच इच्छुक असलेले मतदारसंघ
चिखली - अर्चना विकास पाटील, गडमुडशिंगी - अश्विनी राजेंद्र वळिवडे, उजळाईवाडी - अरुणिमा सुनील माने, पाचगाव- सुरेखा शंकर सातपुते, सांगरूळ - अशोक घाडगे, तिसंगी - दिलीप पाटील, असळज- प्रकाश पाटील, कौलव- संजय कलिकते, राधानगरी- सविता राजाराम भाटले, कडगाव- सुनीता धनाजीराव देसाई, उत्तूर - वसंतराव धुरे, आजरा- जयवंत शिंपी, नेसरी - दीपक जाधव, तुर्केवाडी- रामराव गुडाजी, शित्तूर तर्फ वारुण- रणवीर गायकवाड, पिशवी- विजय बोरगे, रुकडी- वेदांतिका धैर्यशील माने, दानोळी- बेबीताई रावसाहेब भिलवडे, अब्दुललाट - मिथुन कोळी, यवलूज- सुप्रिया महेश पाटील.
सिद्धनेर्ली, बड्याचीवाडीत मांदियाळी!
कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली व गडहिंग्लजमधील बड्याचीवाडीतून प्रत्येकी आठजणांनी मागणी केली आहे. करवीरमधील परितेमधून तब्बल सहाजणांची मागणी आहे.

Web Title: 'Clock' will disappear in fifty constituencies -

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.