Kolhapur News: कर्जाला कंटाळले, जिवलग मित्रांनी एकाच दोरीने गळफास घेवून जीवन संपवले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 07:21 PM2023-04-03T19:21:49+5:302023-04-03T19:22:29+5:30

दोघा जिवलग मित्रांनी घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

Close friends hanged themselves with a single rope at Pargaon in Hatkanangle taluka kolhapur | Kolhapur News: कर्जाला कंटाळले, जिवलग मित्रांनी एकाच दोरीने गळफास घेवून जीवन संपवले

Kolhapur News: कर्जाला कंटाळले, जिवलग मित्रांनी एकाच दोरीने गळफास घेवून जीवन संपवले

googlenewsNext

दिलीप चरणे

नवे पारगाव : पारगाव (ता. हातकणंगले) येथे कर्जाला कंटाळून दोन जिवलग मित्रांनी एकाच झाडाला एकाच दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. विनायक शिवाजी पाटील (वय ४०) व बाबासाहेब हिंदुराव मोरे (४२. दोघेही रा. बिरदेवनगर. ता. हातकणंगले ) अशी दोघांची नावे आहेत. ही घटना आज, सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. घटनेची नोंद वडगाव पोलिसात झाली झाली आहे.

या बाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, विनायक पाटील व बाबासाहेब मोरे हे बिरदेवनगर येथे शेजारी रहातात. दोघांच्यात घनिष्ठ मैत्री होती. एकाच मोटरसायकल वरून ते फिरत असत. आज दुपारी एकच्या सुमारास तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमीच्या दक्षिण बाजूस असलेल्या डोंगरात एका झाडाला दोघांनी एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

विनायक पाटील यांचा ट्रकने चिरा ओढण्याचा व्यवसाय होता. तर बाबासाहेब मोरे यांचा जनावरांचा गोटा आहे. दोघेही गाडीवरून कोकणात जाऊन चिरा आणत व त्याची विक्री करत असत. दोघांवरही कर्जाचा डोंगर असल्याने आर्थिक चनचन होती. या नैराश्येतूनच त्यांनी आज गळफास घेवून जीवन संपवले. विनायक यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा व दहा दिवसांची मुलगी आहे. बाबासो मोरे यास आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

नवे पारगावच्या ग्रामीण रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती कांबळे यांनी उत्तरीय तपासणी केली. वडगावचे पोलीस निरीक्षक भैरव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक भीमगोंडा पाटील, हवालदार जावेद रोटीवाले व रणवीर जाधव अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Close friends hanged themselves with a single rope at Pargaon in Hatkanangle taluka kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.