दुकाने बंद करा, अन्यथा कारवाई करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:24 AM2021-04-09T04:24:43+5:302021-04-09T04:24:43+5:30

कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने लॉकडाऊन केले आहे. या लॉकडाऊनमुळे अन्य व्यापारी अडचणीत येणार आहेत. त्यामुळे सर्व नियमांचे पालन ...

Close the shops, otherwise we will take action | दुकाने बंद करा, अन्यथा कारवाई करू

दुकाने बंद करा, अन्यथा कारवाई करू

Next

कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने लॉकडाऊन केले आहे. या लॉकडाऊनमुळे अन्य व्यापारी अडचणीत येणार आहेत. त्यामुळे सर्व नियमांचे पालन करून दुकाने सुरू करण्यास परवानगी द्या, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. गुरुवारी जयसिंगपूर पालिकेत नगराध्यक्षा डॉ. नीता माने, उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, मुख्याधिकारी टिना गवळी, नगरसेवक व काही व्यापाऱ्यांची बैठक झाली. मात्र, ठोस निर्णय झाला नाही. गुरुवारी दुपारी जयसिंगपूर पालिका व पोलीस प्रशासनाने शहरातील दुकाने बंद करावीत, असे आवाहन व्यापाऱ्यांना केले. अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा वगळता अन्य व्यवहार बंद ठेवावेत, अन्यथा कारवाई करू, असा इशारा दिला जात होता. शिरोळमध्येही व्यापारी वर्गात अजूनही बंदबाबत संभ्रमावस्था आहे. फोटो - ०८०४२०२१-जेएवाय-०६

फोटो ओळ - जयसिंगपूर येथे पोलिसांनी अन्य व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले.

Web Title: Close the shops, otherwise we will take action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.