शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ बुधवारी बाजार समिती बंद

By admin | Published: June 13, 2017 12:57 AM2017-06-13T00:57:22+5:302017-06-13T00:57:22+5:30

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती, त्यांच्या उत्पादनाला योग्य भाव व शासनाचा शेतकऱ्याप्रती दबावतंत्र बंद व्हावा...

Closing the market committee on Wednesday in support of the farmers' agitation | शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ बुधवारी बाजार समिती बंद

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ बुधवारी बाजार समिती बंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क--पोर्ले तर्फ ठाणे : अडचणीत सापडलेल्याला मदत करणे म्हणजे माणुसकीचा धर्म होय. शैक्षणिक क्षेत्रातील गरजूंना मदत करून माणुसकीचा धर्म प्रामाणिकपणे कोल्हापूर येथील रंगनाथ आद्य निभावत आहे. त्यांनी गरिबीचे चटके सोसत शिक्षणात भरारी घेणाऱ्या आसुर्ले (ता. पन्हाळा) येथील संपदा विलास वरिंगेकर या मुलीच्या शिक्षणाचे पालकत्व स्वीकारले आहे. शुक्रवारी (ता. ०९) ‘दैनिक लोकमत’मध्ये ‘आर्थिक परिस्थितीवर मात करीत संपदाची भरारी’ या मंथळ्याखालील बातमी वाचून त्यांनी संपदाचे पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला.पाचवीलाच गरिबी पुजलेल्या संपदाने परिस्थितीशी मिळते जुळते घेत बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तिने दहावीत ९० टक्के गुण मिळविल्याने तिची विज्ञान शाखेतून शिक्षण घेण्याची महत्त्वाकांक्षा होती; पण घरची अर्थिक परिस्थिती उच्चशिक्षणाच्या आड येत होती. स्व-मालकीची शेती नसलेले संपदाचे आई-वडील रोजगार करून तिन्ही मुलाचे शिक्षण व संसाराचा गाडा चालवित होते; पण पाच वर्षांपूर्वी संपदाच्या वडलिांचा मृत्यू झाल्याने कुटुंंबाची जबाबदारी आईच्या हाती आल्याने होणारा अर्थिक कोंडमारा तिला सहन होत नव्हता. म्हणून तिने घरच्या परिस्थितीपुढे शिक्षणाच्या महत्त्वाकांक्षेचा त्याग करीत तिने मनाची समजूत काढली. आणि गावातील सरनोबत कॉलेजमध्ये कला शाखेतून शिक्षण घेण्याचे ठरविले. शिक्षणात प्रत्येक वर्गात सरस असणाऱ्या संपदाने कठोर परिश्रम घेऊन बारावीच्या परिक्षेत ८९ टक्के गुण मिळविले.‘लोकमत’ने ‘आर्थिक परिस्थितीवर मात करीत संपदाची भरारी’ या मथळ्याखाली बातमी छापून आली होती. त्यामध्ये संपदाला शिक्षण घेताना घरची परिस्थिती कशी आड आली. याचे वृत्त रंगनाथ आद्य यांनी वाचून संपदाच्या पुढील संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. तिला पदवीच्या शिक्षणाबरोबर डिप्लोमाचे शिक्षण, त्यासाठी लागणारी स्टेशनेरी व प्रवास भाड्याचा खर्च देखील करणार असल्याचे अभिवचन संपदाच्या आईला दिले.

लोकमतचा  प्रभाव

आसुर्ले (ता. पन्हाळा) येथील संपदा वरिंगेकर हिच्या शिक्षणाची जबाबदारी रंगनाथ आद्य यांनी स्वीकारली. डावीकडून सौ. आद्य, संपदाचा भाऊ, रंगनाथ आद्य, संपदाची आई, संपदा, स्वाती गोखले, बाबा शेलार उपस्थित होते.

Web Title: Closing the market committee on Wednesday in support of the farmers' agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.