Diwali -कपडे, पणत्या, आकाशकंदील, दिवाळीसाठी बाजारपेठ सजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 04:22 PM2019-10-17T16:22:43+5:302019-10-17T16:23:34+5:30

अवघ्या नऊ दिवसांवर आलेल्या दिवाळीसाठी कोल्हापुरातील बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. कपडे, पणत्या, आकाशकंदील, रांगोळ्या, शोभेच्या वस्तू यांसह फराळासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी आता कोल्हापूरकरांची लगबग सुरू आहे. दुसरीकडे, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिकांनीही विविध योजना बाजारात आणल्या आहेत.

Clothing, gloves, skyline, the market for Diwali is all set | Diwali -कपडे, पणत्या, आकाशकंदील, दिवाळीसाठी बाजारपेठ सजली

अवघ्या नऊ दिवसांवर आलेल्या दिवाळीसाठी कोल्हापुरातील बाजारपेठेत आकर्षक आकाशकंदिलांची मांडणी करण्यात आली आहे. (छाया : अमर कांबळे)

googlenewsNext
ठळक मुद्देकपडे, पणत्या, आकाशकंदील, दिवाळीसाठी बाजारपेठ सजलीग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना बाजारात

कोल्हापूर : अवघ्या नऊ दिवसांवर आलेल्या दिवाळीसाठी कोल्हापुरातील बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. कपडे, पणत्या, आकाशकंदील, रांगोळ्या, शोभेच्या वस्तू यांसह फराळासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी आता कोल्हापूरकरांची लगबग सुरू आहे. दुसरीकडे, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिकांनीही विविध योजना बाजारात आणल्या आहेत.

वर्षातील सर्वांत मोठा सण म्हणून दिवाळीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वर्षभर खर्चाला कात्री लावून प्रत्येकजण या सणासाठी पैसे जमवत असतो. भिशी, रिकरिंग, बोनस या माध्यमांतून येणारा पैसा सणासाठी आणि आनंदासाठी खर्च केला जातो. सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असली, तिची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत होत असली तरी सर्वसामान्य नागरिकांकडून दिवाळीच्या प्राथमिक तयारीला सुरुवात झाली आहे. दिवाळी महिनाअखेरीस असल्याने नोकरदारांकडून पगार झाल्या-झाल्याच सणाची खरेदी सुरू आहे.

सणाची पहिली खरेदी होते ती कपड्यांनी. महाद्वार रोडवरील फिरत्या व्यावसायिकांपासून ते शोरूमपर्यंत सगळ्यांकडेच फॅशनेबल कपड्यांचे नवीन कलेक्शन आल्याने सध्या सर्वांत मोठा ग्राहकवर्ग आहे तो कपडेखरेदीला.

कोल्हापूरची अख्खी बाजारपेठ ज्या ठिकाणी एकवटली आहे, तो महाद्वार रोड आणि राजारामपुरीचा परिसर सायंकाळी कपडे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. जन्मलेल्या बाळापासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांसाठीच्या कपड्यांची खरेदी कुटुंबीयांकडून सुरू आहे.

याशिवाय रंगीबेरंगी रांगोळ्या, आकर्षक पणत्या, दिवे, तोरण, लटकते तोरण, आकाशकंदील, पर्स, बॅगा, रांगोळीचे छाप, चप्पल अशा अनेकविध साहित्याने महाद्वार रोड भरून गेला आहे.

सूट, भेटवस्तू, योजनांचे आकर्षण

मंदी आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच व्यावसायिकांकडून खरेदीवर २० ते ५० टक्क्यांपर्यंतची सूट, आकर्षक भेटवस्तू आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आॅफर्स देण्यात येत आहेत. एका कपड्याच्या खरेदीवर दोन कपडे मोफत, विशिष्ट रकमेच्या वस्तूवर तेवढ्याच किमतीची वस्तू मोफत, गिफ्ट व्हाउचर, सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीत सूट अशा विविध योजनांनी ग्राहकांना आकर्षित केले जात आहे.

फराळाची आॅर्डर

दिवाळी म्हणजे फराळ... हा रुचकर फराळ बनविण्यासाठी महिलांना किमान चार-पाच दिवस स्वयंपाकघरातच काढावे लागतात. साहित्याच्या खरेदीपासून प्राथमिक तयारी ते प्रत्येक पदार्थ बनवेपर्यंत व त्यानंतरची स्वच्छता या सगळ्या रहाटगाडग्याला दूर सारत महिलांनी, विशेषत: नोकरदार महिलांनी तयार फराळाला प्राधान्य दिले आहे. हा फराळ बनविणाºया महिला संस्थांकडून आॅर्डर घेण्यास सुरुवात झाली आहे.

 

 

Web Title: Clothing, gloves, skyline, the market for Diwali is all set

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.