मुख्यमंत्र्यांनी ऊसदरासाठी आता तिजोरी उघडावी : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 08:56 PM2018-11-05T20:56:37+5:302018-11-05T20:58:12+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना एफआरपी अधिक दोनशे रुपये ऊसदर द्यावा, लागेल ती मदत केली जाईल, त्यासाठी सरकारची तिजोरी खाली करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी पूर्ण अभ्यासाअंतीच ही घोषणा केली असावी, आता त्यांनी तिजोरी उघडावी,

CM should open a safe for lentils: Raju Shetty | मुख्यमंत्र्यांनी ऊसदरासाठी आता तिजोरी उघडावी : राजू शेट्टी

मुख्यमंत्र्यांनी ऊसदरासाठी आता तिजोरी उघडावी : राजू शेट्टी

Next
ठळक मुद्देहंगामाबाबत सरकार-कारखानदारांनी ठरवावेमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे साखर उद्योगाला मदत करण्यासाठी राज्याची तिजोरी खाली करावी.

कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना एफआरपी अधिक दोनशे रुपये ऊसदर द्यावा, लागेल ती मदत केली जाईल, त्यासाठी सरकारची तिजोरी खाली करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी पूर्ण अभ्यासाअंतीच ही घोषणा केली असावी, आता त्यांनी तिजोरी उघडावी, असे आवाहन करत कोणत्याही परिस्थितीत ‘एफआरपी अधिक दोनशे रुपये’ घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

शेतकरी संघटनांनी केलेली मागणी, बाजारातील साखरेचे दर व बँकांकडून मिळणारी उचल यामध्ये तफावत असल्याने संघटनांच्या मागणीप्रमाणे शेतकºयांना दर देऊ शकत नाही, अशी भूमिका घेत बुधवारपासून जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत खासदार शेट्टी यांच्याकडे विचारणा केली असता, ते म्हणाले, कारखानदारांनी गाळप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी सरकार व कारखानदारांनी काय ते ठरवावे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरात येऊन ‘एफआरपी अधिक दोनशे’ रुपये उसाचा दर जाहीर केला आहे. त्यासाठी साखरेचा बाजारातील किमान दर प्रतिक्विंटल ३१०० रुपये करतो, निर्यात साखरेबाबत बँक, केंद्र सरकार व कारखाने यांच्यामध्ये त्रिस्तरीय करार व राज्य सरकारकडून लागेल ती मदत करण्याची ग्वाही जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी दिले होते. या घोषणा फडणवीस यांनी पूर्ण अभ्यासाअंतीच केल्या असणार यात माझ्या मनात शंका नाही. आता त्यांनी त्याची अंमलबजावणी करावी. कारखान्यांनी हंगाम बंद करून कोणाची कोंडी केली हे मला माहिती नाही, हंगामाबाबत सरकार व कारखानदारांनी ठरवावे पण मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे साखर उद्योगाला मदत करण्यासाठी राज्याची तिजोरी खाली करावी.

मागणी मान्य झाल्याशिवाय माघार नाही
एफआरपी अधिक २00 रुपये घेतल्याशिवाय ‘स्वाभिमानी’मागे हटणार नसल्याचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला. दरम्यान,बुधवारी जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी गाळप बंद ठेवले. ‘शाहू’चे सुमारे ८०० टन, तर ‘वारणा’चे ४०० टन ऊस ‘राजाराम’ कारखान्यात आणून गाळप केल्याचे समजते.

Web Title: CM should open a safe for lentils: Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.