सहकाराच्या जिल्ह्यात गटशेतीही बहरतेय-सात प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 11:47 PM2019-02-04T23:47:05+5:302019-02-04T23:47:39+5:30

बहुतांश शेती तुकड्या-तुकड्यांत विभागलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात गटशेती बाळसे धरू लागली असून, कृषी विभागाच्या प्रोत्साहनामुळे ती बहरत आहे. परवडणारी शेती करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सुरू झालेल्या उपक्रमात आतापर्यंत नोंदणी केलेल्या १४५० पैकी १३ गटांनी प्रकल्प आराखडे सादर केले आहेत.

Co-operative district collects aggregate-seven proposals for approval by the government | सहकाराच्या जिल्ह्यात गटशेतीही बहरतेय-सात प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी

सहकाराच्या जिल्ह्यात गटशेतीही बहरतेय-सात प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी

Next
ठळक मुद्दे१४५० गटांची नोंदणी : सहा गटांना ९० लाखांचे अनुदान मिळाले;

नसिम सनदी ।
कोल्हापूर : बहुतांश शेती तुकड्या-तुकड्यांत विभागलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात गटशेती बाळसे धरू लागली असून, कृषी विभागाच्या प्रोत्साहनामुळे ती बहरत आहे. परवडणारी शेती करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सुरू झालेल्या उपक्रमात आतापर्यंत नोंदणी केलेल्या १४५० पैकी १३ गटांनी प्रकल्प आराखडे सादर केले आहेत. यांतील मागील वर्षातील सहा गटांना पहिल्या टप्प्यातील प्रत्येकी १५ लाख असे ९० लाखांचे अनुदानही कृषी विभागाने दिले आहे. कोल्हापूरची ओळख सहकारी संस्थांचा जिल्हा अशी आहे. त्याचाच वेगळा आविष्कार गटशेतीतून फुलत आहे.

शेतीच्या तुकडीकरणामुळे आधुनिक शेती करण्यावर मर्यादा येते. याची जाणीव असलेल्या शेतकऱ्यांनी एकत्रितपणे गटशेतीसाठी प्रस्ताव दिले आहेत. यापैकी २०१७-१८ या वर्षात सहा गटांचे प्रस्ताव मंजूर होऊन त्यांना पहिल्या टप्प्यातील अनुदानही वाटले आहे. २०१८-१९ या चालू वर्षासाठी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडून सात प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे वर्ग केलेत.

गटांना तीन टप्प्यांत अनुदान मिळणार असून, पहिल्या टप्प्यात गटाचे संघटन आणि प्रशिक्षणावर भर आहे. त्यासाठी कमाल २५ लाख रुपयांचे अनुदान आहे. तथापि, आता १५ लाखच देण्यात आले आहेत. दुसºया टप्प्यात प्रकल्पाचे प्रत्यक्ष बांधकाम, यंत्रणा बसविणे, तर तिसºया अंतिम टप्प्यात उत्पादन सुरू करून ब्रॅँडिंग, मार्केटिंग, पॅकिंग यावर भर असणार आहे. दुसºया व तिसºया टप्प्यातील अनुदान गटाने निवडलेल्या राष्ट्रीयीकृत बँकेच्या खात्यावरच कृषी विभागाकडून भरले जाणार आहे. या कालावधीत बँकेने कर्जाच्या स्वरूपात गटाला रक्कम द्यावयाची आहे. ही रक्कम साधारणपणे दरवर्षी सहा कोटी रुपये इतकी आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानदेव वाकुरे यांनी दिली.

२०१८-१९ या वर्षासाठी मंजूर झालेले प्रस्ताव
श्रीमान योगी तुकाराम महाराज शेतकरी सहकारी सेवा संस्था, कासारपुतळे : भात प्रक्रिया
चाळोबा महिला स्वयंम साहाय्यता गट, सातेवाडी, आजरा
व्हर्मीफार्मा व ट्रॅडिशनल
जागर उत्पादक कंपनी :
गूळ उत्पादन
शिवा रामा पाटील संस्था, कारभारवाडी, ता. करवीर : गूळ उत्पादन व सामूहिक सिंचन
नागनाथ महिला
स्वयंसाहाय्यता शेतकरी गट, लाटगाव, ता. आजरा : सेंद्रिय खतनिर्मिती
राटे कृषी उत्पादक व उद्योग समूह खडुळे, ता. गगनबावडा : बांबू मूल्यवर्धन
दूधगंगा अ‍ॅग्रो प्रोड्यूसर
कंपनी, कसबा वाळवे, ता. राधानगरी : भाजीपाला पशुधन व्यवस्थापन.

जिल्ह्यातील या गटांना मिळाले अनुदान
शासनाकडून अनुदानप्राप्त गट प्रकल्प रक्कम
ग्रीन रिव्हॅल्युएशन अ‍ॅग्रो सोल्युशन २ कोटी ३० लाख ४ हजार
कंपनी, केखले (ता. पन्हाळा)
आनंदराव दादा अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनी, कागल २ कोटी २३ लाख ७९ हजार
अन्नदाता नैसर्गिक शेतीमाल २ कोटी ९५ लाख ८३ हजार उत्पादक मंडळ, हातकणंगले
महाबीमा बांबू प्रोड्यूसर कंपनी, हातकणंगले २ कोटी ९ लाख ६७ हजार
महाराष्ट्र कृषी विज्ञान मंडळ, २ कोटी २७ लाख २५ हजार कवळीकट्टी, गडहिंग्लज
शिवमुद्रा शेतकरी गट मांडेदुर्ग, चंदगड कोटी ९७ लाख ८ हजार


 

Web Title: Co-operative district collects aggregate-seven proposals for approval by the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.