सहकाराच्या निवडणुका दोन महिने ढकलल्या पुढे

By admin | Published: February 10, 2017 12:17 AM2017-02-10T00:17:52+5:302017-02-10T00:17:52+5:30

सहकाराच्या निवडणुका दोन महिने ढकलल्या पुढे

Co-operative elections will be postponed for two months | सहकाराच्या निवडणुका दोन महिने ढकलल्या पुढे

सहकाराच्या निवडणुका दोन महिने ढकलल्या पुढे

Next

दत्ता बिडकर --हातकणंगले छातीवर संघटनेचा बिल्ला लावून शेतकरी संघटनेच्या आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांना डावलून तालुक्यातील कुंभोज, रूकडी कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात शेतकरी संघटनेने इतर पक्षातून आयात झालेल्या ‘आयारामां’ना संधी दिल्यामुळे शेतकरी संघटनेच्या निष्ठावंतांमध्ये खदखद सुरू आहे.
तालुक्यातील ११ जिल्हा परिषद मतदारसंघांपैकी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घुणकी, भोदोले, कुंभोज, रूकडी, कोरोची आणि पट्टणकोडोली अशा सहा जिल्हा परिषद मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी घुणकी, भोदोले आणि पट्टणकोडोली या ठिकाणी संघटनेच्या अांदोलनामध्ये सहभागी असलेल्या निष्ठावंत संघटनेच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली असली तरी भोदोले जिल्हा परिषदेची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उमेदवारी मागे घेऊन त्या बदल्यात काँग्रेस पक्षाबरोबर समझोता करून भोदोले पंचायत समितीची जागा पदरात पाडून घेण्यासाठी स्वाभिमानीची धडपड सुरू आहे. तशीच स्थिती पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघात सुरू आहे. पट्टणकोडोली जिल्हा परिषद स्वाभिमानीची उमेदवारी मागे घेऊन या मतदारसंघात स्वाभिमानी शिवसेना आणि प्रकाश आवाडे यांच्या कोल्हापूर जिल्हा ताराराणी आघाडीला पाठिंबा देऊन त्या बदल्यात रूई पंचायत समितीची जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करीत आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात राष्ट्रवादीचे सहयोगी पंचायत समिती सदस्य संतोष शिंदे-माळी या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केलेल्या उमेदवारास संधी दिली आहे, तर याच जिल्हा परिषद मतदारसंघातील लाटवडे पंचायत समितीमध्ये काँग्रेसमधून आलेल्या अशोक माळी यांना संधी दिली आहे. रूकडी जिल्हा परिषद मतदारसंघात स्वाभिमानीने हातकणंगले पंचायत समितीचे काँग्रेस पक्षाचे सभापती आणि महादेवराव महाडिक याचे कट्टर समर्थक राजेश पाटील यांच्या पत्नी पदमाराणी पाटील यांना उमेदवारी दिली आहे, तर रूकडी पंचायत समितीमध्ये स्वाभिमानीने शिवसेनेला साथ दिली आहे.
कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात स्वाभिमानीने राष्ट्रवादीचे यशवंत ऊर्फ भाऊ वाणी या आयारामाना संधी दिली आहे. या मतदारसंघात स्वाभिमानीने शिवसेनेसोबत घरोबा केला आहे. कोरोची जिल्हा परिषद स्वाभिमानीला आणि कोरोची व तारदाळ पंचायत समिती सेनेला यामुळे भाजप आणि आवाडे गटाबरोबर स्वाभिमानीची युती फिस्कटल्याने या मतदारसंघात चुरस वाढली आहे.
तालुक्यातील शिरोली आणि रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपबरोबर आहे, तर हुपरी जिल्हा परिषद मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटना आवाडे ग्रुपच्या ताराराणी आघाडी सोबत आहे. कबनूर जिल्हा परिषद मतदारसंघात आवाडे, पी. एम. पाटील, सुधाकर मणेरे, मदन कारंडे, जयकुमार कोले यांच्या स्थानिक पातळीवर झालेल्या आघाडीला स्वाभिमानीचा पाठिंबा असूनही आघाडी थेट भाजप आमदार सुरेश हाळवणकर यांच्याविरुद्ध लढणार आहे.


तालुक्यात : सर्वच पक्षांबरोबर आघाड्या
तालुक्यात हातकणंगले आणि भादोले जिल्हा परिषदेमध्ये स्वाभिमानी जयवंतराव आवळे यांच्या काँग्रेसबरोबर.
शिरोली आणि रेंदाळमध्ये स्वाभिमानी भाजपसोबत, तर हुपरी जिल्हा परिषदमध्ये स्वाभिमानी आवाडे गु्रपच्या ताराराणीबरोबर राहणार आहे.
तारदाळ, रूकडी आणि पट्टणकोडोलीमध्ये स्वाभिमानी शिवसेनेसोबत असून स्वाभिमानी हा एकमेव पक्ष तालुक्यामध्ये सर्वांच्या बरोबर आघाड्या आणि युती करून काही ना काही पदरात पाडून घेण्यासाठी धडपडत आहे.

Web Title: Co-operative elections will be postponed for two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.