द्वेषापोटी अपात्रतेचा सहकार कायदा

By admin | Published: February 17, 2016 01:15 AM2016-02-17T01:15:32+5:302016-02-17T01:16:39+5:30

अजित पवार : कागलमध्ये वीजनिर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन

Co-operative law of malicious disqualification | द्वेषापोटी अपात्रतेचा सहकार कायदा

द्वेषापोटी अपात्रतेचा सहकार कायदा

Next

कागल : द्वेषापोटी मुश्रीफांना त्रास देण्यासाठीच चंद्रकांतदादा पाटलांनी संचालक अपात्रतेचा नवा सहकार कायदा आणला. केवळ एका व्यक्तीसाठी हा कायदा राज्यभर केला गेला, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.कागल नगरपरिषदेतर्फे उभारलेल्या घनकचऱ्यापासून वीजनिर्मिती या प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर येथील बापूसाहेब महाराज चौकात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. हसन मुश्रीफ होते.
यावेळी आ. सतेज पाटील, उपमहापौर शमा मुल्ला, निवेदिता माने, के. पी. पाटील, मच्छिंद्र सकटे, शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष एस. के. मगदूम, नवीद मुश्रीफ, आदी उपस्थित होते. सभेत अजित पवार म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रावर आगपाखड करणारे हे सरकार आहे. सहकार चळवळ मोडीत काढण्याचे प्रयत्न होत आहेत. गरीब, सर्वसामान्यांच्या योजना बंद करून शेतकरी आणि गरिबांची थट्टा करणारे हे सरकार आहे. बाजार समित्या बरखास्त करण्याचा कुटील डाव यांनी रचला अहे. आमचे सरकार सत्तेवर असताना ऊसदराबद्दल पंतप्रधानांपर्यंत जाऊन निर्णय घेत असू. तेव्हा आंदोलन करणारी शेतकरी संघटना आता गप्प आहे. कारण संघटनेचे नेते सरकारमध्ये बगलबच्चे बनले आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण खूप वाढले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘अच्छे दिन आयेंगे’ म्हणत जनतेच्या डोळ्यांत धूळफेक केली आहे. काळा पैसा आणतो म्हणणारे आता कोठे आहेत? पाकिस्तानला धडा शिकवू म्हणणारे मोदी गुपचूप पाकिस्तानला भेटी देऊन मिठ्या मारत आहेत. हा विरोधाभास आहे, अशी टीका केली.
यावेळी हसन मुश्रीफ, आ. सतेज पाटील, भय्या माने, मनोहर पाटील, रमेश माळी यांची भाषणे झाली. नगराध्यक्षा संगीता गाडेकर यांनी स्वागत केले. मुख्याधिकारी प्रभाकर पत्की यांनी आभार मानले. कार्यक्रमास जयंत पाटील, ए. वाय. पाटील, आर. के. पवार, राजू लाटकर, नामदेवराव भोईटे, विष्णुपंत केसरकर, आदी उपस्थित होते.

जान्हवीला ‘अच्छे दिन’ : मोदींचे कधी?
‘अच्छे दिन’ आलेच नाहीत हे सांगताना अजित पवार म्हणाले की, त्या टी.व्ही. मालिकेतील जान्हवीला दोन वर्षांनी अखेर बाळ झाले, तिला ‘अच्छे दिन’ आले; पण मोदींनी सांगितलेले ‘अच्छे दिन’ अजून आलेले नाहीत. काळ्या पैशातील प्रत्येकी १५ लाख रुपये कधी मिळणार? याची लोक वाट पाहत आहेत.
केवळ कागलसाठी ‘जीआर’
अजितदादा पवार म्हणाले की, कागलच्या राम मंदिरासाठी खासगी ट्रस्ट असतानाही आ. मुश्रीफांनी तीर्थक्षेत्र योजनेतून मोठा निधी दिला. खासगी ट्रस्टला असा निधी देता येत नाही. तो कसा दिला म्हणून मी चौकशी केली तर या बहाद्दराने एका दिवसासाठी तसा जीआर काढला. निधी वर्ग केला आणि जीआर रद्दही केला. फक्त कागलकरांसाठी जीआर, बारामतीलाही नाही. यावर एकच हशा पिकला.

Web Title: Co-operative law of malicious disqualification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.