सहधर्मचारिणीचा यज्ञ- कोल्हापूर सहल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 12:04 AM2018-09-07T00:04:09+5:302018-09-07T00:05:48+5:30
बाळ चव्हाण गेले तसे ८० गाठत आलेले, पण मापे दृष्टी कोणाने अकालीच. अहो, पडजीभ जिभेला लागते म्हणून आपणच स्वत: घरच्या घरी कट करणारे. डोळ्यात वाढलेले लालसर मांस कोकणातल्या कुठल्याशा नदीत मिळणाऱ्या माशाला पकडून त्याचा मेंदू डोळ्यात भरून बरे
शिवशाहीर डॉ. राजू राऊत
बाळ चव्हाण गेले तसे ८० गाठत आलेले, पण मापे दृष्टी कोणाने अकालीच. अहो, पडजीभ जिभेला लागते म्हणून आपणच स्वत: घरच्या घरी कट करणारे. डोळ्यात वाढलेले लालसर मांस कोकणातल्या कुठल्याशा नदीत मिळणाऱ्या माशाला पकडून त्याचा मेंदू डोळ्यात भरून बरे करणारे. कुतुहलापोटी अनेक क्षेत्रांतील अनेक गोष्टी समजून घेऊन त्यात अधिकाधिक भर टाकत त्या विकसित करणारे बाळकाका खरंतर ‘१२५ वर्षे मी जगणारच हो’ असे कित्येकदा पुढ्यात म्हणणारे पुढ्यातच गेले. खरंच, फारच लवकर.
अनेक कलांमधील नैपुण्याबरोबर कुतूहलापोटी घनिष्ट मैत्री असणारे मित्र डॉ. गजाननराव जाधव यांचे आॅपरेशन थिएटरमध्ये ते आॅपरेशन कसे होते? ते पाहायला गेले नि कटिंग ब्लेडमधील कमतरता लक्षात आली. घरी असणाºया दीड फुटी लेथवर पोलादी कास्ंिटग करून धारदार कटिंग ब्लेडस्पेक्षा फारच सुपीरिअर करणारे काका असे कसे अचानक गेले, हा विचार माझ्या बालमनावर कितीतरी वेळा टोचत राहिला.
वाशीनाक्यावरचे ते घर मुलांचे संसार, व्यवसायापोटी गावात. मुले, नातवंडे सुट्टीला आधीमधी येतच होती; पण त्या रंकाळ्याच्या काठावरील एरवी टुमदार आकर्षक दिसणाºया घरात राहिल्या त्यांच्या पत्नी शकुंतलाताई. एरवी जोडीनेच आनंदात आल्या-गेलेल्यांचे स्वागत, आदरातिथ्य करीत. सदैव हसतमुखाने काकांच्याबरोबर घरकाम करीत. त्यांच्या प्रत्येक कामात हात मिळवत. मग, ते पेंटिंग, मोल्डिंग ते इतर सर्व छंद. ज्या सदैव हसतमुखाने काम करीत त्याच ताई पूर्णपणे त्या घरात एकट्या पडल्या; पण चेहºयावरचे हास्य लोप पावले नव्हते.
मुला-बाळांचीही तक्रार नव्हती. गरजाही फार नव्हत्या; पण वेळ जाणे नि अर्थार्जनासाठी पतीकडून मिळालेल्या थोड्याफार अनुभवातून पेंटिंग सुरू केले. आपल्या पतीच्या संबंधित व शहरातील बड्या लोकांच्या पोट्रेटस्च्या आॅर्डर मिळवून कामे करीत.
तसे बºयापैकी कौशल्य त्यांनी प्राप्त केले होते. त्या स्वत: नेटाने बºयापैकी काम करीत. अगदीच काही अडले तर मॉर्निंग वॉकला रवींद्र मेस्त्री (दादा), कधी कधी चांगदेव शिगावकर, तर कधी माझे वडील कृ. दा. राऊत हे फायनल टचेस देऊन आॅर्डर पूर्ण करून कामाला हातभार लावत. जेणेकरून त्या जागेचे रंग, ब्रशचे नाते तरी तार्इंनी अखंड ठेवले होते. पुढे जवळपास १२-१३ वर्षे हे काम त्यांनी नेटाने सहधर्मचारिणी या नात्याने कोल्हापूरच्या कला परंपरेत पाय रोवून खंबीरपणे केले हेच मोठे कौतुक.
१९९१ साली मात्र वाशीनाक्यावरील रंकाळ्यातल्या त्या ऐतिहासिक घरात एका काळरात्री ताईची अज्ञातांकडून निर्घृण हत्या झाली. तपास आजवर लागला नाही, ही मोठी दुर्दैवाची गोष्ट. मग मात्र छत्रपतींनी कलासंवर्धनासाठी दिलेल्या या जागेतील कलासंबंधच तुटला. कुटुंबीयांचेही प्रापंचिक व्यापातून जाणे-येणे कमी होत गेले. काकांचा स्टुडिओ जुगाराचा अड्डा बनला. तळीराम व जुगारडे यांचा ठिय्या रात्रंदिवस पाने कुटत बसायचा. आत मोठमोठी कर्तबगार लोकांची शिल्पे शांतपणे वेळेचा हा ‘डाव’ बघत शांत, निश्चय, निर्विकार पाहत होती. एकदा मी माझे पत्रकार मित्र उदय कुलकर्णी यांना घेऊन नजरेखाली घातले व मी, उदय कुलकर्णी, उदय गायकवाड, राजू पाटील व पोवाड्यातील सर्व सहकारी मिळून तिथले फोटो काढून तत्कालीन जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या ऐतिहासिक पुरुषांच्या शिल्पांची दुरवस्था थांबवावी, अशी विनंती केली किंवा कुटुंबीयांचे हवाली करा, अशी सूचनाही केली. नंतर ती कुटुंबीयांच्या हवाली केली. परत कुठे काय नि कसे घडले समजले नाही.
पश्चिमेला शालिनी पॅलेस व पूर्वेला बाळ चव्हाण यांचा स्टुडिओ ही दोन्ही रंकाळ्याच्या दोन्ही बाजंूवरील पे्रक्षणीय स्थळे. येता-जाता नेहमी मान वळविली की, ‘बाळ चव्हाण कलामंदिर व मत्स्यालय’ अशी अक्षरे असणारा त्या घराच्या भिंतीवरील तांबड्या अक्षरातील बोर्डही दिसायचा. दरम्यान, रंकाळा परिसर सुशोभीकरण योजना सुरू झाली. घराशेजारच्या खणी स्वच्छ केल्या गेल्या नि एकेदिवशी तिकडून जाताना ते बाळ चव्हाण यांचे घर दिसलेच नाही. अरे! फक्त उरले होते ते घराशेजारील चिंचेचे झाड आणि घराच्या जागेवरून एखाद्या कालसर्पासारखा मोठे वळण घेणारा पदपथाचा रस्ता.कलेचे माहेरघर म्हणतात या कोल्हापूरला; पण हे असं काही आठवलं की, हे नक्कीच वाटतंय कलेचे माहेर कलाकारांचं सासर...
(लेखक कोल्हापुरातील नामवंत आर्टिस्ट आहेत.)
kollokmatpratisad@gmail.com