तिर्थक्षेत्र विकासाचा नारळ फोडा, अन्यथा घरासमोर उपोषण, रवि इंगवले यांचा पालकमंत्र्यांना इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 04:40 PM2019-05-21T16:40:48+5:302019-05-21T16:41:54+5:30
महसूलाच्या जोरावर पैशांची उधळपट्टी करणारे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निव्वळ घोषणांचा पाऊस पाडला. त्यांनी आता श्री अंबाबाई तिर्थक्षेत्र विकास आराखड्याचा नारळ फोडावा अन्यथा त्यांच्या निवासस्थानासमोर उपोषण केले जाईल. तर त्यांच्यासह देवस्थानच्या अध्यक्षांनाही मंदीराचा दरवाजा बंद करु असा इशारा शिवसेनेचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी दिला.
कोल्हापूर : महसूलाच्या जोरावर पैशांची उधळपट्टी करणारे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निव्वळ घोषणांचा पाऊस पाडला. त्यांनी आता श्री अंबाबाई तिर्थक्षेत्र विकास आराखड्याचा नारळ फोडावा अन्यथा त्यांच्या निवासस्थानासमोर उपोषण केले जाईल. तर त्यांच्यासह देवस्थानच्या अध्यक्षांनाही मंदीराचा दरवाजा बंद करु असा इशारा शिवसेनेचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी दिला.
करवीर निवासिनी श्री अंबाबाई तिर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी ८० कोटीं रुपये मंजूर झाले पण ते विकासासाठी अद्याप वर्ग का नाही झाले? असा प्रश्न उपस्थित करत शिवसेना शहर शाखेच्यावतीने शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळी श्री अंबाबाई मदीर, महाद्वार चौकात तीव्र निदर्शने केली, त्यावेळी इंगवले बोलत होते. यावेळी रास्ता रोको आंदोलनामुळे महाद्वार रोडवर वाहतुकीची कोंडी झाली होती. आंदोलनात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांचे नाव न घेता इंगवले यांनी त्यांच्यावर सडकून टिका केली.
इंगवले म्हणाले, करवीर नगरीला काँग्रेसपासून भाजप सरकारपर्यत नेहमीच उपासात्मक ठेवले आहे. पंढरपूरचा विकास होतो, नृसिंहवाडीचा होतो, मग कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदीराचा विकास न करण्याचा पालकमंत्र्यांचा हेतू काय? असा प्रश्न उपस्थित करत इंगवले म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस व पालकमंत्री पाटील हे श्री अंबाबाईसमोर माथा टेकवून तिर्थक्षेत्र आराखड्याच्या नुसतीच घोषणा करतात. अंधारात काजव्यांचा महोत्सव करणाऱ्यांंचा विकास आता उजेडातही दिसेनासा झाला आहे. तीर्थक्षेत्राची बोळवण करणाºया मंत्री पाटील यांनी भक्तांची मानसिक फसवणूक केली असल्याचा आरोप करण्यात आला.
या आंदोलनात बाबासाहेब महाडिक, राजाभाऊ घोरपडे, आबाजी जगदाळे, तात्या साळोखे, उदय माने, उमेश पाटील चंद्रकांत नवरुखे, उमेश पाटील, सचिन कारंडे, युवराज खाडे, उपप्रमुख जयवंत हारुगले, कपिल केसरकर, विक्रम पाटील, विक्रम शिंदे, राकेश माने, राजू कदम, सुरेश फडतारे, संदीप भालकर, सुमीत चौगुले, रवि चौगुले, बंडा लोंढे, तानाजी जाधव आदींचा समावेश होता.