आचारसंहिता पथक, मीडिया समिती ठेवणार नजर - ग्रामपंचायत निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:24 AM2021-01-03T04:24:35+5:302021-01-03T04:24:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकीअंतर्गत सुरू असलेल्या आचारसंहितेचे योग्यरीत्या पालन होत आहे की नाही तसेच पेड न्यूज, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकीअंतर्गत सुरू असलेल्या आचारसंहितेचे योग्यरीत्या पालन होत आहे की नाही तसेच पेड न्यूज, सोशल कमेंट, सोशल मीडिया यांवर लक्ष ठेवण्यासाठी आचारसंहिता पथक व मीडिया समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी ही समिती स्थापन केली असून कामकाज करण्यासाठी अध्यक्ष, सदस्य व सदस्य सचिव यांची उपविभागनिहाय नेमणूक करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी हे समितीचे अध्यक्ष असून उपविभागीय पोलीस अधिकारी, तालुक्याचे तहसीलदार, गटविकास अधिकारी हे सदस्य आहेत; तर नायब तहसीलदार येथे सदस्य सचिव आहेत.
य अधिकाऱ्यांना आचारसंहिता, पेड न्यूज, सोशल कमेंट, सोशल मीडिया यांबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे कामकाज करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व वेळोवेळी अहवाल सादर करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
--