कोल्हापुरात आचारसंहितेचा धसका
By admin | Published: January 12, 2017 01:25 AM2017-01-12T01:25:50+5:302017-01-12T01:25:50+5:30
दुसऱ्या टप्प्यात मतदान : क्रीडा स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रमातून पदाधिकारी पडले बाहेर
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी दुसऱ्या टप्प्यात म्हणजे २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याचे समजताच जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमातून जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला. आचारसंहितेचा धसका घेऊन ते बाहेर पडल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा बुधवारी होणार याची कल्पना बहुतांशी पदाधिकारी, सदस्यांना होती. त्यामुळे फारसे पदाधिकारी जिल्हा परिषदेकडे फिरकलेच नाहीत. मात्र, संध्याकाळी क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी अध्यक्षा विमल पाटील, बांधकाम समितीच्या सभापती सीमा पाटील, पक्षप्रतोद शहाजी पाटील, सदस्य अर्जुन आबिटकर हे पोलिस मैदानावर पोहोचले. अतिशय जल्लोषी वातावरणामध्ये बक्षीस वितरण कार्यक्रमाला सुरुवातही झाली. एवढ्यात जिल्हा प्रशासनाकडून जिल्हा परिषदेच्या प्रशासन विभागाकडे (पान ८ वर)
...अखेर शाहू पुरस्कार वितरण राहिलेच
काँग्रेस-स्वाभिमानीच्या जिल्हा परिषदेतील सत्तारूढांना तीन वर्षांचे जिल्हा परिषदांना देण्यात येणारे शाहू पुरस्कार न देण्याची नामुष्की मात्र ओढावून घ्यावी लागली. २०१४/२०१५/२०१६ या तीन वर्षांचे हे पुरस्कार १५ सदस्यांना जाहीर करण्यात आले. विमल पाटील यांच्यापासून ते अरुण इंगवले यांच्यापर्यंतच्या आघाडीच्या १५ सदस्यांना हे पुरस्कार देण्यात येणार होते. मात्र, वेळेत या कार्यक्रमाचे नियोजन करता न आल्याने कारकिर्दीत जाहीर झालेला पुरस्कार मात्र या विजेत्यांना स्वीकारता
आला नाही.
जिल्हा परिषदेची आचारसंहिता जाहीर झाली आणि अध्यक्षा विमल पाटील, बांधकाम समितीच्या सभापती सीमा पाटील, पक्षप्रतोद शहाजी पाटील आणि सदस्य अर्जुन आबिटकर यांनी बक्षीस वितरण न करता बाहेर पडणे पसंद केले.