पायोनियरमध्ये ‘सीओईपी पुणे’ विजेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:24 AM2021-04-09T04:24:21+5:302021-04-09T04:24:21+5:30

कोल्हापूर : येथील केआयटी कॉलेजने आयोजित केलेल्या पायोनियर या राष्ट्रीय तांत्रिक (ऑनलाईन) स्पर्धेत अभिव्यक्ती प्रकारामध्ये कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ...

‘COEP Pune’ winners in Pioneer | पायोनियरमध्ये ‘सीओईपी पुणे’ विजेते

पायोनियरमध्ये ‘सीओईपी पुणे’ विजेते

Next

कोल्हापूर : येथील केआयटी कॉलेजने आयोजित केलेल्या पायोनियर या राष्ट्रीय तांत्रिक (ऑनलाईन) स्पर्धेत अभिव्यक्ती प्रकारामध्ये कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (सीईओ) पुणे येथील विस्पी करकरिया, संकेत वर्देकर या विद्यार्थ्यांनी विजेतेपद पटकाविले. केआयटीच्या श्रीधर कटवे, क्रेया चोपडे आणि ऐश्वर्या पाटील, विनायक माळी यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला.

या स्पर्धेचा ऑनलाईन पारितोषिक वितरण आयएसटीईचे अध्यक्ष प्रतापसिंह देसाई यांच्या हस्ते झाले. शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील प्रमुख उपस्थित, तर केआयटीचे उपाध्यक्ष सुनील कुलकर्णी अध्यक्षस्थानी होते. विद्यार्थ्यांनी पदवीपेक्षा कौशल्यांवर भर देण्याचे आवाहन देसाई यांनी केले. यावेळी डॉ. एम. एम. मुजुमदार, अक्षय थोरवत, ग्रंतेज ओतारी, दिविजा भिवटे, आदी उपस्थित होते. केआयटीचे संचालक डॉ. व्ही.व्ही. कार्जिन्नी यांनी प्रास्ताविक केले. आयएसटीईचे समन्वयक अभिजित पाटील यांनी अहवाल वाचन केले. प्रा. क्षितिजा ताशी यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. आयएसटीई स्टुडंट चाप्टरची विद्यार्थिनी मधुरा शिंदे यांनी आभार मानले. आर्या पाटील, सिद्धांत पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

स्पर्धेतील विजेते

मेकॅनिकल इंजिनिअरिंग (विजेत्यांची नावे प्रथम, द्वितीय, तृतीय अशी) : वृषभ कराडे, संघर्ष पाटील, इमॅन्युअल तोंडीकट्टी, समृद्धी हर्डीकर (केआयटी). विस्पी करकरिया, संकेत वर्देकर, राहुल येडगिरे (सीओईपी). सुशांत मोरे, शेख उबेद आस्लम, ओंकार वर्णे (केआयटी). कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनिअरिंग : श्रेयस साळुंखे. निखिल जुगळे, वैशाली कदम, मिताली चौगुले, रणतित चव्हाण. वाघेश्वर यादव (केआयटी). इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग : तेजस चव्हाण, जयतीर्थ दांबळ, श्रीराज घोरपडे, रूपेश पोवार (डीकेटीई). आर्या सावंत, यशदीप पाटील (केआयटी). शुभम भरमगोंडा, विकास केसरवाणी, धनंजय कटगिरी, सचिन फडतरे (शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग). बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग : नीलम मुजावर, ऐश्वर्या किल्लेदार, रेवती गुरव (डीकेटीई). शर्वरी देवणे, दिविजा भिवटे, गिरीजा भालकर. सायली लोळे, अकृती स्वामी, जाई सावंत (केआयटी). सिव्हिल अँड इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग : समृद्धी पाटील, रिंकिता तायडे (पिंपरी चिंचवड, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग). पूजा एकनाळी. राजगुरू कांबळे, योगेंद्र पवार, ओंकार खामकर, जिज्ञासा राऊत (केआयटी).

फोटो (०८०४२०२१-कोल-केआयटी कॉलेज) : केआयटी कॉलेजमधील पायोनियर राष्ट्रीय तांत्रिक स्पर्धेच्या पारितोषिक वितरणावेळी सुनील कुलकर्णी, व्ही.व्ही. कार्जिन्नी, एम. एम. मुजुमदार, अक्षय थोरवत, ग्रंतेज ओतारी, दिविजा भिवटे आदी उपस्थित होते.

Web Title: ‘COEP Pune’ winners in Pioneer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.