तुती लागवड ते कापड निर्मितीचे एकात्मिक मॉडेल उभारण्यास सहकार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:49 AM2020-12-17T04:49:18+5:302020-12-17T04:49:18+5:30
केंद्रीय रेशीम संशोधन प्रशिक्षण संस्था आणि म्हैसूर येथील केंद्रीय रेशीम मंडळाचे संचालक डॉ. पंकज तिवारी, सहसंचालक एम. मूर्ती, शिवकुमार ...
केंद्रीय रेशीम संशोधन प्रशिक्षण संस्था आणि म्हैसूर येथील केंद्रीय रेशीम मंडळाचे संचालक डॉ. पंकज तिवारी, सहसंचालक एम. मूर्ती, शिवकुमार हुक्केरी यांनी विद्यापीठाच्या सेंटर फॉर एक्सलन्स आणि इन्क्युबेशन इन सेरिकल्चरला गेल्या आठवड्यात भेट दिली. येथे सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. विद्यापीठाच्या रेशीमशास्त्र विभागामार्फत मार्गदर्शन प्राप्त यळगूड (ता. हातकणंगले) येथील आप्पासो झुंजार, राजेंद्र बागल यांच्या रेशीम शेतीची पाहणी केली. या अधिकाऱ्यांनी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी प्राणिशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. व्ही.एस. मन्ने, रेशीमशास्त्र सेंटरचे समन्वयक डॉ. ए. डी. जाधव उपस्थित होते.
चौकट
ग्रामीण विकासात योगदान
रेशीम शेतीविषयक माहिती व तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवून त्यांना सातत्याने आवश्यक मार्गदर्शन पुरविणाऱ्या विद्यापीठाचे ग्रामीण विकासात मोलाचे योगदान असल्याचे मत या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
फोटो (१६१२२०२०-कोल-रेशीम संशोधन) : शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांची केंद्रीय रेशीम संशोधन प्रशिक्षण संस्थेचे संचालक डॉ. पंकज तिवारी, सहसंचालक एम. मूर्ती, शिवकुमार हुक्केरी यांनी भेट घेतली. यावेळी व्ही.एस. मन्ने, ए.डी. जाधव, आदी उपस्थित होते.