पोलीस बंदोबस्तात साखर कारखान्यांचे गाळप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 01:06 AM2019-01-14T01:06:02+5:302019-01-14T01:06:08+5:30
कोल्हापूर : ‘एफआरपी’चे तुकडे पाडल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, त्यांनी कारखान्यांची शेती कार्यालये लक्ष्य केली आहेत. या ...
कोल्हापूर : ‘एफआरपी’चे तुकडे पाडल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, त्यांनी कारखान्यांची शेती कार्यालये लक्ष्य केली आहेत. या कार्यालयांची फोडाफोडी सुरू असल्याने, कारखान्यांनी पोलीस बंदोबस्तात गाळप सुरू केल्याने कारखान्यांना पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.
साखरेचे दर आणि देय एफआरपी यांचा ताळमेळ बसत नाही. त्यात सरकारने मदतीसाठी हात वर केल्याने शुक्रवार (दि. ११) पासून कारखानदारांनी प्रतिटन २३०० रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यास सुरुवात केली. त्यानंतर एकरकमी ‘एफआरपी’साठी आग्रही असलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आणि आंदोलनाने पेट घेतला. संघटनेने शनिवारी दिवसभर शिरोळ व हातकणंगले तालुक्यांतील विविध कारखान्यांच्या शेती कार्यालयांची तोडफोड व पेटवापेटवी सुरू केली. आंदोलन अधिक तीव्र करण्याचा संघटनेने इशारा दिल्याने रविवारी साखर कारखान्यांनी पोलीस बंदोबस्ताची ाागणी केली. त्यानुसार जिथे ‘स्वाभिमानी’चे प्रभावक्षेत्र आहे, तेथील कारखान्यांवर रविवारी सकाळपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक, दोन अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पाच पोलीस उपअधीक्षक व कारखाना कार्यक्षेत्रातील पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचारी ‘स्वाभिमानी’च्या आंदोलनावर लक्ष ठेवून आहेत. वायरलेसच्या माध्यमातून पोलीस यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिले आहेत. पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील हे पोलीस कर्मचाºयांसह आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दालमिया शुगर्स येथे बंदोबस्तासाठी होते.
तुटलेल्या उसाचे गाळप करा
शेतकºयांसाठी आंदोलन सुरू असताना त्याचा फटका शेतकºयांनाच होऊ नये, याबाबत ‘स्वाभिमानी’ दक्ष आहे. तुटलेला ऊस शेतात पडून वाळू नये, त्याचे गाळप करू द्या, अशा सूचना संघटनेच्या वतीने कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत.