कोल्हापूरात पावसाने दुमजली घराची भिंत कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 06:32 PM2017-09-19T18:32:23+5:302017-09-19T18:36:05+5:30

The collapse of the wall of the second house collapsed in Kolhapur | कोल्हापूरात पावसाने दुमजली घराची भिंत कोसळली

कोल्हापूरात पावसाने दुमजली घराची भिंत कोसळली

Next
ठळक मुद्देअडकलेल्या महिलेची सुटकाकोल्हापूर महापालिका परिसरातील घटनालाख रुपयाचे नुकसान

कोल्हापूर : गेल्या चार दिवसांपासून कोल्हापुरात सुरू असलेल्या पावसामुळे महापालिका परिसरातील जुन्या दुमजली घराची मातीची भिंत कोसळली. सोमवारी मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी घरामध्ये दुसºया मजल्यावर अडकून पडलेल्या महिलेची अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. बाळाबाई महिपतराव पाटील (वय ६०) असे त्यांचे नाव आहे.

अधिक माहिती अशी, महापालिकेसमोरील बोळात रोहिडेश्वर मंदिर आहे. त्याच्याशेजारी कुमोदिनी बाळासाहेब सोनवणे व शंकरराव बाबूराव पाटील यांची दुमजली मातीच्या भेंड्याची घरे आहेत. या दोघांच्या घराची सामाईक भिंत एकच आहे. ती भिंत पावसाने सोमवारी मध्यरात्री कोसळली.

अचानक घडलेल्या या प्रकाराने दोन्ही कुटुंबीयांतील लोक जिवाच्या भीतीने बाहेर पळत आले तर दुसºया मजल्यावर बाळाबाई पाटील अडकून पडल्या. त्या जिवाच्या भीतीने ओरडू लागल्या. त्यांना बाहेर काढण्यासाठी कोणीच पुढे जात नव्हते.

हाकेच्या अंतरावरील महापालिका अग्निशामक दलास स्थानिक नागरिकांनी वर्दी देताच जवान दिलीप बिरांजे, मनिष रणभिसे, माणिक कुंभार, तानाजी वडर, प्रमोद मोरे, शिवाजी खेडकर, सुरेंद्र जगदाळे, नीतेश शिनगारे आदी घटनास्थळी आले. त्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता बाळाबाई पाटील यांना सुखरूप बाहेर काढले.

लाख रुपयाचे नुकसान

कुमोदिनी सोनवणे यांचे घराच्या तळमजल्यावर वाईन शॉप आहे. भिंत पडून दुकानातील मद्याच्या बाटल्या, बॉक्स फुटले, तसेच घरातील रोप साहित्य, फर्निचर, विजेच्या वस्तू असे मिळून एक लाख रुपयांचे नुकसान झाले.

Web Title: The collapse of the wall of the second house collapsed in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.